Sugarcane
Sugarcane  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugarcane : महाराष्ट्र, कर्नाटकात यंदा ऊस क्षेत्रात सात टक्क्यांनी वाढ

Raj Chougule

कोल्हापूर : येणारा गळीत हंगाम (Sugarcane Crushing Season) हा वाढीव ऊस क्षेत्राचा असणार असल्याचे स्पष्ट होत आहे. उपग्रह प्रतिमांचा अंदाज, विविध साखर कारखान्यांच्या ऊस क्षेत्राच्या (Sugarcane Acreage) नोंदी आणि सध्या पडणारा पाऊस यांच्या एकत्रित अहवालानुसार येणारा हंगाम हा जादा उसासह अतिरिक्त साखर उत्पादनाचा (Excess Sugar Production) असेल अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी देशात ५५.८३ लाख हेक्टर क्षेत्रावरील उसाचे गाळप झाले. येत्या हंगामात ५८.२८ लाख हेक्टर क्षेत्रातील उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) वतीने उपग्रह प्रतिमांचा अंदाज घेऊन येणाऱ्या गळीत हंगामाबाबत नियोजन करण्यात आले. या वेळी झालेल्या बैठकीत विविध राज्यांच्या ऊस क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. देशभरातील साखर उत्पादक राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उसाचे क्षेत्र, अपेक्षित उत्पन्न, मागील आणि सध्या नोंदणीचे क्षेत्रीय अहवाल, सध्याचा व संभाव्य पाऊस या विषयावर चर्चा करण्यात आली.

उपग्रह प्रतिमांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार २०२२-२३ चे अंदाजे ऊस क्षेत्र ५८.२८ लाख हेक्‍टर आहे. २०२१-२२ मध्ये क्षेत्र ५५.८३ लाख हेक्टर होते. यंदा यात चार टक्के वाढ शक्य आहे. यंदाच्या हंगामात जुलैच्या मध्यापर्यंत ४४४ कोटी लिटर इथेनॉलचे करार करण्यात आले आहेत. यापैकी ३६२ कोटी लिटर इथेनॉल हे फक्त साखर उद्योगातून तयार झाले आहे. २०२२ २३ या वर्षाकरिता १२ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी ५४५ कोटी लिटर इथेनॉलनिर्मिती होण्याची गरज आहे. इथेनॉलकडे वळल्यामुळे ४५ लाख टन साखर कमी तयार होऊ शकते, असा अंदाज आहे. इथेनॉलकडे जाणारी साखर वगळता येणाऱ्या वर्षात ३५५ लाख टन साखरेची निर्मिती होऊ शकेल आणि २७५ लाख टन साखरेची देशांतर्गत विक्री होऊ शकेल, असा अंदाज आहे. हा अंदाज पाहता देशाला यंदा ८० लाख टन साखर कोणत्याही परिस्थितीत निर्यात करावीच लागेल तरच अतिरिक्त साखरेचा भार कमी होईल, असा अंदाज साखर उद्योगातील प्रतिनिधींचा आहे.

महाराष्ट्रात ऊस क्षेत्र १४.४१ टक्के

गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात २३.८ लाख हेक्टरवर उसाचे क्षेत्र होते. यंदा २३.७२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी १३.५० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता, यंदा त्यात वाढ होऊन उसाचे क्षेत्र १४.४१ टक्क्यांवर पोहोचले आहे. कर्नाटकात ५.८५ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. यंदा हे क्षेत्र ६.२५ पर्यंत गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तर प्रदेशात ३, महाराष्ट्र, कर्नाटकात ७, तमिळनाडूत ६, गुजरातमध्ये ५ तर अन्य राज्यांत उसाचे क्षेत्र ४ टक्क्यांनी वाढले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT