Sugar Sales Increased Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Market : दसऱ्याच्या खरेदीत साखरेला अपेक्षित दर नाही

Sugar Rate : दिवाळीसाठीची साखर खरेदी येत्या काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. दसऱ्यापूर्वी काही दिवस अगोदर दसरा सणासाठी कारखान्याकडून साखरेची खरेदी झाली.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : दिवाळीसाठीची साखर खरेदी येत्या काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. दसऱ्यापूर्वी काही दिवस अगोदर दसरा सणासाठी कारखान्याकडून साखरेची खरेदी झाली. या काळात क्विंटलला ३० ते ४० रुपयांपर्यंत साखरेच्या दरात वाढ झाली. मात्र खरेदीला म्हणावा तसा वेग नसल्याने साखरेच्या दराची वाढ मर्यादित राहिल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले.

दसरा झाल्यानंतर आता दिवाळीसाठी साखरेची खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या व्यापाऱ्यांकडून साखरेच्या दराबाबतची नोंदणी कारखान्याकडे करणे सुरू असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. सध्या साखरेचे दर प्रतिनुसार ३६०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटल इतके आहेत. दसऱ्यापूर्वी जितके दर होते त्यात केवळ ३० ते ४० रुपयांची वाढ झाली. मात्र या वाढीत ही सातत्य नसल्याचे कारखान्यांनी सांगितले.

दिवाळीच्या काळात मात्र साखरेची खरेदी येत्या आठ दिवसांत वेगामध्ये होईल, अशी शक्यता आहे. केंद्राने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचा कोटा मर्यादित दिल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात साखर विक्रीस येईल, अशी शक्यता नाही. यामुळे यंदा कारखान्यांना साखरेला दर चांगला मिळेल, असा अंदाज आहे.

दिवाळीमुळे साखरेला मागणी वाढण्याची शक्यता असल्याने ऑक्टोबरच्या उत्तरार्धामध्येच ऑक्टोबरसाठी कारखान्यांना दिलेला साखरेचा कोटा पूर्ण होऊ शकतो असे कारखाना सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रातील कारखान्यांना वर्षभर बहुतांश करून राज्यातूनच मागणी असते. दिवाळीच्या काळात मात्र अनेकदा राज्याबाहेरून साखरेला मागणी येते, यामुळे दिवाळीच्या काळात इतर कालावधीपेक्षा साखरेच्या दरात वाढ असते.

सध्या केंद्राने अजूनही एमएसपीत कधी वाढ होईल या बाबत निश्‍चित खात्री दिली नाही. दिवाळीच्या कालखंडात एमएसपी वाढवल्यास साखरेचे दर किरकोळ बाजारात ही वाढतील या शक्यतेने एमएसपी वाढीचा निर्णय हा दिवाळीनंतरच होऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे. यामुळे दिवाळीसाठी साखर खरेदी ही सध्याच्या दरानेच व्यापाऱ्यांना करावी लागणार आहे. तातडीने एमएसपी वाढीची शक्यता नसल्याने आम्ही नियमित प्रमाणातच साखर खरेदी करत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

मुबलक साखर शिल्लक

गेल्या वर्षीची मुबलक साखर शिल्लक असल्याने यंदा बाजारात साखरेची टंचाई भासणार नाही अशी स्थिती आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्राचाही या कालावधीसाठी कोटा वाढविण्याबाबत हालचाली सध्या तरी नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari Irrigation Reform: थकबाकी वसुली, स्वायत्तता अजेंड्यावर

Well Approval Irregularities: पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी दिली परस्पर ३७ विहिरींना मंजुरी

Grape Vineyard Destroyed: उभ्या द्राक्ष बागेवर माथेफिरूकडून कुऱ्हाड

Transport Business Issue: ट्रान्सपोर्ट व्यवसाय ‘व्हेंटिलेटर’वर

Tree Cutting Ban: नाशिकमध्ये वृक्षतोडीला २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT