Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean MSP Procurement : सोयाबीन खरेदीची मुदत निम्मी संपली मात्र २ टक्केही खरेदी नाही; आतापर्यंत केवळ २४ हजार टनांची खरेदी पूर्ण

Soybean Market Update : हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु होऊन ३९ दिवस झाले तरी अजून उद्दीष्टाच्या २ टक्केही खरेदी झाली नाही. हमीभावाने आतापर्यंत केवळ २३ हजार ९२१ टन खरेदी झाली. तर खरेदीची मुदत १२ जानेवारीला संपणार आहे.

Anil Jadhao 

Pune News : हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु होऊन ३९ दिवस झाले तरी अजून उद्दीष्टाच्या २ टक्केही खरेदी झाली नाही. हमीभावाने आतापर्यंत केवळ २३ हजार ९२१ टन खरेदी झाली. तर खरेदीची मुदत १२ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे १३ लाख ८ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट साध्या होईल का? याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. 

राज्यात सरकारने १३ लाख ८ हजार टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यास मान्यात दिली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १० लाख टन खरेदीला मान्याता दिली. राज्यात खरेदी ९० दिवस चालणार आहे. खरेदीची प्रक्रिया १२ जानेवारीपर्यंत सुरु राहील. राज्यात प्रत्यक्ष खरेदी १५ ऑक्टोबरपासून सुरु झाली. म्हणजेच खरेदी सुरु होऊन ३९ दिवस झाले. मात्र आतापर्यंत २ टक्केही उद्दीष्ट पूर्ण झालं नाही. राज्यात आतापर्यंत केवळ २३ हजार ९२१ टन सोयाबीनची खरेदी झाली. 

सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देण्यासाठी केंद्र सरकारने मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणा या ६ राज्यांमध्ये ३२ लाख २३ हजार टन सोयाबीन खेरदीला परवानगी दिली. मात्र तेलंगणा वगळता इतर राज्यांमध्ये खरेदीची गती खूपच कमी आहे. त्यातही महाराष्ट्रातील खरेदी चिंताजनक आहे. 

राज्यात यंदा १३ लाख ८ हजार टन सोयाबीन हमीभावाने खेरदीचे उद्दीष्ट आहे. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर खरेदीची घोषणा केली होती. तसेच राज्यात १५ ऑक्टोबरपासून खरेदी सुरु झाली. मात्र दीड महिना होऊनही सोयाबीन खरेदीने वेग घेतलेला नाही. त्यामुळे सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. सोयाबीनचे भाव आज महीभावापेक्षा ७०० रुपयांपर्यंत कमी आहेत. 

खरेदीची स्थिती

सरकारने १३ लाख ८ हजार टन सोयाबीन हमीभावाने खेरदीचे उद्दीष्ट ठेवले. मात्र आतापर्यंत केवळ २३ हजार ९२१ टन सोयाबीनची खरेदी झाली. खरेदी सुरु होऊन ३९ दिवस झाले. म्हणजेच खरेदीची मुदत जवळपास निम्मी संपली. तरीही उद्दीष्टाच्या २ टक्केही खरेदी होऊ शकली नाही. खरेदीची गती पाहता मदुतीपर्यंत निम्म उद्दीष्टही साध्य होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

केंद्र आणखी वाढणार

राज्यात आतापर्यंत ५३२ खरेदी केंद्रांना खरेदीची मान्याता देण्यात आली. त्यापैकी ५०८ खरेदी केंद्रांवर खरेदी सुरु असल्याचे पणन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. सरकारने अलिकडेच सोयाबीन खरेदीतील ओलाव्याची अट १५ टक्के केली. त्यामुळे खेरदीचा वेग वाढला. तसेच केंद्रांवर सोयाबीनची आवकही वाढत आहे. गरज भासल्यास आणखी खरेदी केंद्रे सुरु करण्यात येतील, असा असेही पणन विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

खरेदीची मर्यादा

सोयाबीन खरेदीसाठी मर्यादा घालण्यात आली आहे.  एका शेतकऱ्याकडून एका दिवसात २५ क्विंटलचीच खरेदी केली जाते. त्यामुळे २५ क्विंटलपेक्षा जास्त माल असलेल्या शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. तसेच खरेदी केंद्रे कमी असल्याने नोंदणी करूनही अनेक दिवस खरेदीला बोलवत नाहीत. त्यामुळे खरेदी वाढवून खरेदीतील मर्यादा काढून टाकावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT