Maize Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Rate : मलकापुरात मक्याचा किमान दर १३८० पर्यंत घसरला

Maize Market : विदर्भात मक्याच्या खरेदी-विक्रीसाठी येथील बाजारपेठ प्रसिद्ध आहे. सध्या या बाजार समितीत मक्याचा दर खाली आला आहे.

Team Agrowon

Buldhana News : विदर्भात मक्याच्या खरेदी-विक्रीसाठी येथील बाजारपेठ प्रसिद्ध आहे. सध्या या बाजार समितीत मक्याचा दर खाली आला आहे. किमान दर अवघा १३८० पासून मिळत आहे. तर, कमाल दर १८५० पर्यंत आहे. या भावाने फारच कमी मालाची विक्री होत असल्याची वस्तुस्थिती आहे.

मलकापूर बाजार समितीत सध्या मक्याची आवक दररोज वाढत आहे. आता बाजार समित्या दिवाळीमुळे बंद असल्या तरी दोन दिवसांपूर्वी या बाजारात सुमारे दोन हजार क्विंटलपर्यंत आवक पोचली होती. सततच्या पावसाने मका पिकाचे उत्पादन पट्ट्यात प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे मालाचा दर्जाही खालावला.

खराब माल, ओलावा या कारणांमुळे मक्याचा दर खाली आल्याचे कारण दिले जाते. सोमवारी (ता.२८) कमाल दर १८५० रुपयांप्रमाणे केवळ ४० क्विंटल माल विक्री झाला. तर किमान दर १३८० रुपयांनी सुमारे १०० क्विंटल माल विकला. सरासरी १६५० रुपये दराने १७०० क्विंटल मक्याची विक्री झाल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. आता दररोज आवक वधारू लागली आहे.

याच बाजारात सोयाबीन सरासरी ३४८० रुपयांनी विकले आहे. सोयाबीनची आवकही ७ हजार क्विंटलवर पोहोचली. बाजारात सरासरी ३४८० रुपये दराने ५५८५ क्विंटल माल विकला. तर कमाल ४२७५ रुपये दराने ५०० क्विंटल सोयाबीन विक्री झाले. किमान ३०९० रुपये दराने १००० क्विंटल मालाची उचल केली गेली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Farming : संकट असतंच, पण हार मानून कसं चालंल!

October Heatwave : ‘ऑक्टोबर हीट’चा चटका कायम

Soybean Procurement : हमीदराने सोयाबीन खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू करा

Labor Migration : रोजगाराअभावी पुसद तालुक्‍यात मजुरांचे स्थलांतर

Crop Damage Compensation : नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी २८.५३ कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT