Baramati News : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातबंदीबाबत धरसोड धोरण अवलंबल्याने कांद्याचे वाढलेले भाव पुन्हा कोसळले आहेत. लोणंद बाजार समितीत सोमवारी (ता. १९) प्रतिक्विंटल २४०० रुपयांवर गेलेल्या कांद्याची तीनच दिवसांत गुरुवारी (ता. २२) दरात तब्बल नऊशे रुपयांची घसरण झाली असून, दर पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहेत. फसवणुकीच्या भावनेने शेतकरी संतप्त झाले असून, व्यापारीही होरपळले गेले आहेत.
लोणंद (ता. खंडाळा) बाजार समितीत कांद्याला १५ फेब्रुवारीस ९०० ते १४५१ रुपये प्रतिक्विटंल असा दर मिळाला. तर नीरा (ता. पुरंदर) बाजार समितीत १७ फेब्रुवारीस १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.
या चदिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने कांद्याच्या निर्यातीस हिरवा झेंडा दाखवल्याचे वृत्त आले. त्यानंतर लोणंद समितीत सोमवारी (ता. १९) कांद्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. दहा हजार पिशव्यांची आवक झाली होती.
परंतु दोनच दिवसांत केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ३१ मार्चपर्यंतची निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतरही दर टिकतील अशा आशेने शेतकऱ्यांनी दीड पट अधिक म्हणजेच १५००० पिशवी कांदा गुरुवारी बाजारात आणला.
मात्र लिलावादरम्यान शेतकऱ्यांचा उत्साह संपून गेला होता आणि व्यापाऱ्यांचे चेहरे उतरले होते. कारण आज उत्तम प्रतीचा कांदा १३०० ते १५५१ रुपये, मध्यम प्रतीचा कांदा ९०० ते १३०० रुपये आणि लहान कांदा ५०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल अशा दराने विकला गेला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.