Ginger  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Rate : आले दरात घसरण सुरूच

Ginger Market Update : गेली तीन वर्षे समाधानकारक दर राहिलेल्या आले पिकाचे दर मागील सहा महिन्यांपासून घसरण सुरू झाली. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत सध्याचे निम्म्यावर म्हणजेत गाडी मागे तब्बल १३ हजार रुपयांनी कमी झाले आहेत.

विकास जाधव : अॅग्रोवन वृत्तसेवा

Satara News : गेली तीन वर्षे समाधानकारक दर राहिलेल्या आले पिकाचे दर मागील सहा महिन्यांपासून घसरण सुरू झाली. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत सध्याचे निम्म्यावर म्हणजेत गाडी मागे तब्बल १३ हजार रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या आले पिकास प्रतिगाडी (५०० किलो) १२ ते साडेबारा हजार रुपये दर मिळत आहे. मागील पंधरा दिवसांत आल्याच्या दरात प्रतिगाडी तीन ते चार हजार रुपये घट झाली आहे. दरातील घसरणीमुळे आले उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ लागले आहेत.

आले पिकांच्या दरातील घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. जुलै महिन्यात आले पिकाच्या खरेदीत प्रतवारी करून प्रतिगाडीस (५०० किलो) ४० हजार रुपये दर मिळत आहे. जून महिन्याच्या तुलनेत प्रतिगाडी सात ते आठ हजारांनी दरात घट झाली आहे. या काळात घसरण सुरूच राहिली होती.

जुलै महिन्याच्या अखेरीस पाच ते आठ हजारांनी घट होऊन नवे-जुने एकत्रित आले पिकास प्रतिगाडी (५०० किलो) २५ ते २८ हजार रुपये दर मिळत होता. प्रतवारी केलेल्या आल्‍यास प्रतिगाडीस ३७ ते ४० हजार रुपये दर मिळाला होता. सप्टेंबर महिन्यात प्रतवारी केलेल्या आल्‍यास प्रतिगाडी ३२ ते ३४ हजार रुपये तसेच नवीन आल्यास प्रतिगाडी नऊ ते ११ हजार रुपये दर मिळाला होता.

त्‍यानंतर आॅक्टोबर महिन्यात आल्याच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली होती. मात्र पुन्हा नोंव्हेबर महिन्यात घसरण सूरू झाली. नोव्हेंबर महिन्यात आल्यास गाडीस १५ ते १६ हजार रुपये दर टिकून राहिले होते. आता दरात पुन्हा घसरण सुरू झाली आहे. सध्या आल्यास प्रतिगाडी १२ ते साडेबारा हजार हजार रुपये दर मिळत आहे. मागील १५ दिवसांच्या तुलनेत आल्याच्या दरात तीन ते चार हजार रुपये घट झाली आहे. सध्या मिळत असलेला दर मागील तीन वर्षांतील निंचाकी दर आहे.

दरातील घसरणीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. जानेवारी ते मे महिन्याच्या दरम्यान आले पिकांचे दर तेजीत राहिल्यामुळे बियाण्याच्या दरांनी विक्रम करत ५० ते ५५ हजार रुपये बियाणे गाडी खरेदी केली होती. या ही वर्षी दर चांगले मिळतील या आशेवर जिल्ह्यात ५०० हेक्टरने क्षेत्रात वाढ होऊन तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर आल्याची लागवड झाली आहे. मे महिन्यापासून गाडीला ४८ ते ५० हजार रूपये दर मिळाला होता. यांनतर मात्र घसरण होत हे दर १२ ते साडेबारा हजारांवर आले आहेत.

आवकेत वाढ

सातारा जिल्ह्यात या हंगामात दमदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचल्याने मूळकुज, कंदकुजमुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झाले आले. एकूण लागवडीच्या ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर पिकांवरील मूळकुज बाधित झाले होते. आले पीक टिकविण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात असल्याने खर्चात वाढ झाली. मात्र अनेक प्लॉट नियंत्रणात न आल्याने काढण्याकडे कल वाढला. यामुळे खराब आल्याबरोबर चांगलेही निघत आहे. तसेच आल्याचे क्षेत्रही वाढले असल्याने सध्या बाजारात आल्याची आवक वाढली आहे. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे.

दर राहिलेत असे...

मागील तीन महिन्यांच्या तुलनेत दर निम्यावर.

आले खराब होत असल्‍याने आले काढण्याकडे कल वाढला.

बाजारात आल्याची आवकेत वाढ झाल्याने दरात घसरण.

सध्याचे दर मागील तीन वर्षांतील सर्वांत कमी दर.

नवीन बियाणे खरेदीवेळी दराचे चित्र स्पष्ट होणार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT