Minister Shivrajsingh Chauhan  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Mission 2030: देश कापूस क्षेत्रात २०३० पर्यंत स्वयंपूर्ण करणार

Agriculture Minister Shivrajsingh Chauhan: कापसाची आयात २०३०च्या पूर्वाधापर्यंत बंद करणे तसेच त्याची निर्यात सुरू करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अतिसघन कापूस लागवड पद्धतीला प्रोत्साहन दिले जाईल. त्याकरिता बियाणे कंपन्या तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेने उपयुक्‍त वाणांवर संशोधन करावे.

Team Agrowon

Nagpur News: कापसाची आयात २०३०च्या पूर्वाधापर्यंत बंद करणे तसेच त्याची निर्यात सुरू करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अतिसघन कापूस लागवड पद्धतीला प्रोत्साहन दिले जाईल. त्याकरिता बियाणे कंपन्या तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेने उपयुक्‍त वाणांवर संशोधन करावे, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.

कोइमतूर येथे कापूस उत्पादकता वाढीसाठीच्या उपाययोजनांवर मंथन करण्यासाठी शुक्रवारी (ता.११) आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरिराज सिंह, महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे, गोविंद वैराळे, शेतकरी दिलीप पोहाणे, दिलीप ठाकरे उपस्थित होते.

या वेळी बोलताना चौहान म्हणाले, की दिलीप ठाकरे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला अतिसघन कापूस लागवडीचा अकोला पॅटर्न देशभरात नावारूपास आला. वर्धा येथील श्री. पोहाणे यांनी देखील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या माध्यमातून सघन कापूस लागवडीवर भर देत उत्पादकता वाढीचा टप्पा गाठला. सघन व अतिसघन लागवड पद्धतीचे दृश्‍य परिणाम समोर आल्याने या लागवड पद्धतीला देशभरात प्रोत्साहन दिले जाईल.

सध्या देशाच्या विविध भागांत एचटीबीटीच्या आड अनधिकृत बियाणे लागवड होत आहे. त्यामुळेच कापूस उत्पादकांची मागणी लक्षात घेता या तंत्रज्ञानाला कायदेशीर करता येईल का? यावर आमचा विचार सुरू आहे. कापूस उत्पादकता वाढीत मातीचे आरोग्य हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावर देखील भर दिला पाहिजे.

कापूस पट्ट्यात नजीकच्या काळात तण नियंत्रणाची समस्या तीव्र झाली आहे. त्याकरिता मजुरांच्या उपलब्धतेची अडचण, तण नियंत्रणासाठीचा वाढता उत्पादकता खर्च, असे आव्हान आहे. ही बाब कृषी तसेच वस्त्रोद्योग मंत्रालयाने गांभीर्याने घेतली आहे. तण नियंत्रणाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची एचटीबीटीची मागणी आहे. त्यापार्श्‍वभूमीवर पर्यावरण मंत्रालयाशी संवाद साधला जाईल, असे श्री. चौहान यांनी सांगितले.

कृषिमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

गुलाबी बोंड अळीसाठी एआय आधारित फेरोमेन ट्रॅपचा वापर.

कापूस शेतीत सुलभ आणि कमी किमतीच्या यांत्रिकीकरणावर भर.

बोगस निविष्ठा प्रकरणात कारवाईसाठी कडक कायदे.

अल्प जमीनधारणा लक्षात घेता त्यानुसार परवडणारे यांत्रिकीकरण.

बियाणे कंपन्या व संशोधन संस्थांच्या सहकार्यातून वाण, तंत्रज्ञान उपलब्ध होणार.

वाण, तंत्रज्ञान विकसित केले. परंतु ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही तर त्याचा उपयोग काय? विकसित तंत्रज्ञान लॅब टू लॅण्ड पोहोचावे याकरिता प्रभावी कृषी विस्तार यंत्रणा विकसित केली जाईल. दक्षिण भारतात यंत्र तपासणी संस्थेची मागणी पुढे आली. त्याला तत्काळ मान्यता देण्यात येत आहे. देशी कापूस वाणांच्या संशोधन आणि गुणवत्ता विकासावरही काम होईल.
शिवराजसिंह चौहान, केंद्रीय कृषिमंत्री
अतिसघन कापूस लागवडीचा अकोला पॅटर्न याविषयी केंद्रीय कृषिमंत्र्यांनी उत्सुकतेने जाणून घेत आपल्या भाषणात सातत्याने याचा उल्लेख केला. यापुढील काळात देशभरात याची अंमलबजावणी करीत उत्पादकता वाढीचा उद्देश साधला जाणार आहे.
दिलीप ठाकरे, कापूस उत्पादक शेतकरी, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT