Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : तुरीचे सरासरी दर दहा हजार रुपयांहून कमी

Tur Rate : गतवर्षी विविध कारणांनी तुरीच्या उत्पादकतेत घट झाली होती. बहुतांश गतवर्षीच्या हंगामातील शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केली आहे.

माणिक रासवे

Hingoli News : जिल्ह्यातील सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवडाभरापासून तुरीचे सरासरी दर दहा हजार रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. मंगळवारी (ता.३०) तुरीची २९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९५०० ते कमाल ११२०० रुपये तर सरासरी ९८०० रुपये दर मिळाले.

गतवर्षी विविध कारणांनी तुरीच्या उत्पादकतेत घट झाली होती. बहुतांश गतवर्षीच्या हंगामातील शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सेनगाव बाजार समितीतील तुरीच्या नियमित आवकेत घट झाली आहे.

मागील आठवड्यात पाच दिवसांत तुरीची रोज १७ ते ६० क्विंटलनुसार एकूण १८४ क्विंटल आवक झाली. सेनगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात १४ हजारांवर हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे.

मागील आठवड्यापासून तुरीच्या दरात ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाली आहे. अनेक दिवसांनंतर किमान दर दहा हजारांपेक्षा कमी झाले आहेत. सोमवारी (ता.२९) १७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९५०० ते कमाल ११००० रुपये तर सरासरी ९७०० रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता.२६) ३९ क्विंटल आवक होऊन किमान ९५०० ते कमाल ११२०० रुपये तर सरासरी ९७०० रुपये, गुरुवारी (ता.२५) ३९ क्विंटल आवक होऊन किमान ९५०० ते कमाल ११००० रुपये तर सरासरी ९७०० रुपये, तर बुधवारी (ता.२४) ६० क्विंटल आवक होऊन किमान ९५०० ते कमाल १०५०० रुपये तर सरासरी ९८०० रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT