Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : खानदेशात केळीची आवक वाढली; दरात नरमाई

Banana Rate : खानदेशात केळीच्या आवकेत मागील आठवड्यात आणखी वाढ झाली आहे. यातच उत्तरेकडे पाऊस व अन्य अडचणींमुळे बाजार अस्थिर झाला आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात केळीच्या आवकेत मागील आठवड्यात आणखी वाढ झाली आहे. यातच उत्तरेकडे पाऊस व अन्य अडचणींमुळे बाजार अस्थिर झाला आहे. त्यामुळे दरात नरमाई दिसत आहे. दर्जेदार किंवा निर्यातक्षम केळीला १४०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

किमान दर ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल आहे. तर मध्यम दर्जाच्या केळीला १०००, ११०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. केळीचे दर आठ ते १० दिवसांपूर्वी कमाल १६०० ते १६५० रुपये प्रतिक्विंटल होते. काश्मिरात पाठवणुकीच्या केळीचे दर १६५० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक होते.

परंतु सध्या काश्मिरात पाठवणुकीच्या केळीचे दर क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांनी कमी झाले आहेत. काश्मिरात मागील चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे तेथील बाजारावर परिणाम झाला असून, केळीची तेथील मागणी या आठवड्यात कमी झाली आहे. तेथील बाजार पूर्ववत झाल्यानंतर केळी दरात सुधारणा होईल, असे सांगण्यात आले.

मागील वर्षी एप्रिल अखेरीस व मे महिन्यात केळीचे दर १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. परंतु यंदा या महिन्यात दर १७०० रुपयांवर पोचले नाहीत. त्यात घसरणही झाली आहे. खानदेशात सध्या प्रतिदिन ३५० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. आवकेत मागील आठ ते १० दिवसांत सुमारे १५ ट्रकने वाढ झाली आहे. मागील वर्षी जून, जुलैमध्ये लागवड केलेल्या केळी बागांत काढणीला सुरुवात झाली आहे.

सर्वाधिक आवक जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल व मुक्ताईनगर भागात होत आहे. तसेच चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागांतही केळीची आवक होत आहे. जळगाव जिल्ह्यात रोज २७० ते २७५ ट्रक केळीची आवक होत आहे.

यात सर्वाधिक आवक रावेरात होत आहे. केळीची पाठवणूक दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान येथे केली जात आहे. कमी दर्जाच्या केळीची पाठवणूक राज्यात नागपूर व छत्तीसगड भागात केली जात आहे. केळी आवकेत पुढील पंधरवड्यात आणखी वाढ होईल, असे संकेत आहेत.

निर्यातीचे दरही कमी

निर्यातीच्या केळीचे दरही कमी असून, सध्या रोज आठ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात आखातात केली जात आहे. नंदुरबारातून केळीची निर्यात अधिक होत आहे. जळगाव जिल्ह्यातूनही रोज तीन ते चार कंटेनर केळीची पाठवणूक आखातात विविध खरेदीदार कंपन्या करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

Pandharpur Wari: पंढरपूरच्या वाटेवर संतांचे पालखी सोहळे

Maharashtra Transport Strike: मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला प्रतिसाद

Tur Dal Cess Scam: तूर सेस चोरीच्या दंडाचे २६ लाख न्यायालयात आगाऊ भरावेत

Global Onion Market: भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान, चीनच्या कांद्याला मागणी

SCROLL FOR NEXT