Sugar Season Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Season : देशातील चार कारखान्यांचा गळीत हंगाम जानेवारी अखेरीच आटोपला; राज्यातील गाळपाची स्थिती काय?

देशात यंदाच्या हंगामातील ४ साखर कारखान्यांनी हंगाम बंद केला आहे. यंदा ५२० साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Sugarcane Crushing Season कोल्हापूर : देशात यंदाच्या हंगामातील (Sugar Season) ४ साखर कारखान्यांनी हंगाम बंद केला आहे. यंदा ५२० साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. (Sugarcane Crushing)

३१ जानेवारी अखेरच्या आकडेवारीनुसार चार कारखान्यांनी आपला हंगाम समाप्त केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत एक कारखाना बंद झाला होता.

महाराष्ट्रात यंदा १९९ साखर कारखान्यांनी ८१ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. या खालोखाल उत्तर प्रदेशने ५८ लाख तर कर्नाटकाने ४६ लाख टन साखरेचे उत्पादन केले.

अन्य राज्यांनी ३० लाख टन साखरेची निर्मिती केली आहे. गेल्या वर्षी १६ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्यात आली होती. यंदा २२ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्यात आली आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत महाराष्ट्रातून ७८ लाख, उत्तर प्रदेश मधून ५५ लाख, तर कर्नाटकातून ४३ लाख टन साखरेची निर्मिती झाली होती. यंदा जानेवारी अखेर २१६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

गेल्या वर्षी २०३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सात टक्के कारखाने जादा सुरू झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.४ टक्के साखर यंदा जादा उत्पादित झाली आहे.

महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये एकरी उत्पादनात घट अपेक्षित आहे. जरी देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक साखर निर्माण होणार असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यात साखर कमी उत्पादन होण्याचा अंदाज काही संस्थांनी व्यक्त केला आहे.

पण काही तज्ज्ञांच्या मते अगदी थोड्या अंतरामध्येच साखर उत्पादनातील घट असेल. फेब्रुवारी महिन्यात आणखी साखर कारखाने बंद होण्याची शक्यता असल्याचे ‘इस्मा’च्या सूत्रानी सांगितले.

राज्यात गतीने ऊस तोडणी सुरू

सध्या देशातील ऊस पट्ट्यामध्ये कुठेही पावसाचे वातावरण असल्याने ऊस तोडणी गतीने सुरू आहे.

महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मजुरांची अडचण भेडसावत असून कारखान्यांनी आतापासूनच ऊस तोडणी यंत्राने ऊस तोडणी करण्यास प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रातील कारखाने मार्चपासून हळूहळू बंद होण्यास सुरुवात होईल, अशी शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer Issue: वरुडबाजार समितीच्या संमतीने होतेय संत्रा बागायतदारांची लूट

Black Diwali: राष्ट्रवादी पक्ष काळी दिवाळी साजरी करणार: शरद पवार

Custard Apple Season: यंदा सीताफळाचा हंगाम ‘गोड’

Dhandhanya Krushi Yojana: ‘धनधान्य कृषी’ योजनेमुळे तयार होणार नऊ जिल्ह्यांचे आराखडे

Maharashtra Weather Update: कमाल तापमान ३२ अशांपार

SCROLL FOR NEXT