Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production : थायलंडमध्येही साखर उत्पादन घटणार

Global Sugar Production : सध्या हा देश तीव्र दुष्काळाशी सामना करत असल्याने यंदा या देशातही पुरेशा साखर उत्पादनाचे आव्हान आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : ब्राझील, भारतानंतर साखर उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या थायलंडमध्येही साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सध्या हा देश तीव्र दुष्काळाशी सामना करत असल्याने यंदा या देशातही पुरेशा साखर उत्पादनाचे आव्हान आहे. साखर बाजारात जगात प्रामुख्‍याने या तीन देशांचा दबदबा आहे. यंदा मात्र थायलंडमध्ये फारशी समाधानकारक स्थिती नाही.

थाई शुगर मिलर्स या संघटनेने देशात दुष्काळी परिस्थिती असल्याचे सांगितले आहे. याचा तोटा तेथील उस उत्पादकांबरोबर साखर उद्योगालाही बसणार असल्याचे संघटनेने म्‍हटले आहे. दुष्काळामुळे उसाची वाढ खुंटल्याने उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटेल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन ३१ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, असे तेथील साखर उद्योगाचे म्हणणे आहे.

व्यापारी सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार थायलंडमध्ये १७ वर्षांतील साखर उत्पादनाचा नीचांक होण्याची शक्‍यता आहे. देशात सुमारे ७० लाख टन साखर तयार होईल, असा व्यापारी सूत्रांचा अंदाज आहे. तर कारखानदारांच्‍या संघटनेने मात्र ९० लाख टनांपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. एकूणच जागतिक उत्पन्‍नात यंदा थायलंडचा वाटा कमी असणार असल्याचे चित्र आहे.

ब्राझील वगळता भारत व आता थायलंडमध्येही साखर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. यामुळे अनेक देशांना यंदा ब्राझीलच्या साखरेवर अवलंबून रहावे लागेल अशी चिन्हे आहेत. यंदा भारतातून साखर निर्यात होण्याची शक्‍यता नसल्याने भारताच्या शेजारील देशही साखरेसाठी ब्राझीलचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे.

ब्राझीलमध्ये यंदा साखरेचे उत्पादन चांगले होण्‍याचा अंदाज असून जागतिक साखर उत्पादन घटीचा फायदा त्यांनाच होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात ब्राझीलची साखर जादा येण्याची शक्यता निर्माण झाल्याने जागतिक बाजारात साखरेचे दर काहीसे नरमले. मागणीवरही परिणाम झाला. पण भविष्‍यातील स्थिती पाहता ही घसरण अल्पकाळ राहण्याची शक्‍यता साखर उद्योगाने व्यक्‍त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT