Sugar Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Sale Quota: फेब्रुवारीसाठी २२.५० लाख टन साखर विक्री कोटा

February Sugar Quota: केंद्राने फेब्रुवारी महिन्यासाठी देशातील साखर कारखान्यांना २२.५० लाख टनांचा साखर विक्री कोटा जाहीर केला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: केंद्राने फेब्रुवारी महिन्यासाठी देशातील साखर कारखान्यांना २२.५० लाख टनांचा साखर विक्री कोटा जाहीर केला आहे. जानेवारीसाठी इतकाच कोटा केंद्राने जाहीर केला होता. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने बुधवारी (ता.२९) ‘एक्स’ अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली.

दहा लाख टन साखर निर्यातीच्या केंद्राच्या परवानगीनंतर इथेनॉल दरवाढीच्या निर्णयाबाबत ही सकारात्मकता निर्माण झाली आहे. याचा अनुकूल परिणाम येत्या काही महिन्यांत साखर दरावर होण्याची शक्यता आहे. यंदाचा हंगाम सुरू झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात केंद्राने साखर उद्योगाबाबत सकारात्मक हालचाली करण्यास सुरुवात केली आहे.

निर्यातीच्या निर्णयानंतर केंद्र साखर उद्योगासाठी काहीतरी करत आहे, या वातावरणामुळे साखर बाजार ही क्विंटलला शंभर ते दोनशे रुपयांनी वधारला आहे. सध्या कारखानदार जागतिक मिळणारा दर, वाहतूक खर्च याबाबत अंदाज घेत असून, येत्या काही दिवसांत निर्यातीसाठी साखर बंदरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

अजूनही बहुतांशी कारखानदार साखरदराबाबत अंदाज घेण्यातच गुंतलेले आहेत. काही कारखानदार प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या स्थानिक बाजारातील दर वाढत आहेत. या तुलनेत जागतिक बाजारात किती दर आहेत हे पाहून किती निर्यात करायची याबाबत माहिती घेण्यात येत आहे.

बाजार विश्‍लेषकांनी येत्या काही महिन्यात उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर व साखर घटीच्या अंदाजामुळे साखरेचे दर वाढतील अशी माहिती दिली. साखर कारखानदारही दर वाढण्याच्या प्रतीक्षेत असून तातडीने निर्यातीचा निर्णय विचार करूनच घेण्यात येत असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. सध्या तरी निर्यातीबाबत केवळ माहिती घेऊन कोट्यानुसार साखर तयार ठेवण्याचे प्रयत्न कारखानदाराकडून होत आहेत.

साखर कमी उत्पादित होणार हे लक्षात येऊनही निर्यातीस परवानगी दिल्याने साखर बाजारात मात्र सध्या उत्साह असल्याचे चित्र आहे. अजून देशात थंडीचे प्रमाण कमी-अधिक असल्याने साखरेच्या खरेदीसाठी शीतपेय, आइस्क्रीम क्षेत्रातील औद्योगिक कंपन्या अजून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या नाहीत. साखरेचे दर वाढू लागताच या कंपन्या भविष्यात जादा दराने साखर खरेदी करावी लागेल या शक्यतेने लवकरच साखर खरेदी करतील अशीही शक्यता साखर उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, यामुळे साखरेच्या दरात वाढ कायम राहण्याचा अंदाज असल्याचे सांगण्यात आले.

‘एफआरपी’चा दबाव

साखरेचे दर आठ ते दहा दिवसांपासून वाढल्याने कारखानदार स्थानिक बाजारातही साखर विक्री करण्यासाठी धडपडत असल्याचे सूत्रांनी सांगितले. अनेक कारखान्यांना एफआरपी देण्याचा दबाव असल्याने जेवढी साखर विक्री होईल तेवढ्या लवकरच शेतकऱ्यांचे देणे भागवता येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Center Strike: ‘साथी पोर्टल’ विरोधात सोमवारी विदर्भात कृषी केंद्रधारकांचा बंद

Vidhan Parishad Opposition Leader : सतेज पाटील विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते?

Heavy Rain Issue: उत्तरेकडील पावसाने केळी बाजाराला फटका

Fish Price: मासळीच्या दरात सुधारणा

Onion Procurement Irregularities: कांदा खरेदीतील ‘सप्लाय व्हॅलिड’ एजन्सी संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT