Sugar Rate agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Market : कोट्याइतकीच साखर विक्री करा, अन्यथा कठोर कारवाई

Sugar Sale : साखर कारखान्यांनी दिलेल्‍या साखर कोट्याइतकीच साखर विक्री करावी, असे स्पष्ट निर्देश केंद्राने साखर कारखान्यांना दिले आहेत.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : साखर कारखान्यांनी दिलेल्‍या साखर कोट्याइतकीच साखर विक्री करावी, असे स्पष्ट निर्देश केंद्राने साखर कारखान्यांना दिले आहेत. नॅशनल सिंगल विंडो सर्व्हिस या पोर्टलवर साखर कारखान्यांनी विक्रीची माहिती अचूक द्यावी, अशाही सूचना कारखान्यांना दिल्या आहेत.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबतचे पत्र कारखान्यांना जारी केले आहे. जर दिलेल्या कोट्याप्रमाणे साखर विक्री न झाल्यास साखर कोट्यात कपात करणे अथवा कोटाच न देण्याची कारवाई होऊ शकतो असा दमही कारखान्यांना केंद्राने दिला आहे. याबाबतचे पत्र कारखान्यांना नुकतेच दिले आहे.

केंद्राने गेल्या सहा महिन्यांहून अधिक कालावधीपासून प्रत्येक साखर कारखान्यांची साखर विक्रीची माहिती ऑनलाइन भरण्‍याची सक्ती केली आहे. देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती वाढू नयेत यासाठी साखर विक्री केलेली माहिती जीएसटी डेटासह भरणे अनिवार्य केले आहे. परंतु कारखान्यांनी केलेली साखर विक्री व जीएसटी डेटा जुळत नसल्याने केंद्राने कारखान्यांच्या विक्री पद्घतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे.

काही कारखाने दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त, तर काही कारखाने दिलेल्या कोट्यापेक्षा कमी साखर विक्री करत असल्याचे केंद्राला आढळून आले आहे. यामुळे साखरेची उपलब्धता केंद्राला समजत नसल्याने अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने कारखान्‍यांच्या साखर विक्री पद्धतीवर आक्षेप घेतला आहे.

प्रत्येक साखर कारखान्याने त्यांच्या मासिक रिलीज कोट्यातील किमान ९० टक्के साखर विक्री करणे अपेक्षित आहे. पण कारखाने या नियमाचा भंग करीत असल्‍याचा आरोप केंद्राचा आहे. मासिक रिलीज कोट्यापेक्षा जास्त प्रमाणात साखरेची विक्री करणे जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ आणि साखर (नियंत्रण) आदेश, १९६६ च्या तरतुदींचे उल्लंघन मानले जाईल आणि त्याचे पालन न करणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा केंद्राने दिला आहे.

...अशी होणार कारवाई

जर एखादा कारखाना मासिक रिलीज कोट्याच्या ९० टक्क्यांपर्यंत साखर विकू शकला नाही, तर वाटप केलेल्या प्रमाणातील फरक आणि विक्रीचे प्रमाण पुढील महिन्याच्या रिलीज कोट्यातून कमी केले जाईल. उदाहरणार्थ, जो साखर कारखाना एका महिन्यात १०० टन कोट्यापैकी केवळ ८० टन विकतो आणि पुढील महिन्यात त्या कारखान्याचा कोटा १२० टन आहे,

पुढील महिन्यासाठी त्या कारखान्याचा कोटा पात्र प्रमाणाच्या ८० टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल, म्हणजे त्या कारखान्‍याला ९६ टन साखर विक्रीचा कोटा मिळू शकतो. मासिक रिलीज कोट्याचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे मासिक रिलीज कोटा देखील थांबविला जाऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT