Tur and Chana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Chana Stock : तूर, हरभऱ्यावर साठा मर्यादा लागू

Tur Chana Market : तूर आणि हरभरा डाळीचे भाव कमी करण्यासाठी सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत साठा मर्यादा लागू राहील.

Anil Jadhao 

Pune News : तूर आणि हरभरा डाळीचे भाव कमी करण्यासाठी सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत साठा मर्यादा लागू राहील. काबुली हरभऱ्यावरही साठा मर्यादा असेल. साठा मर्यादा तातडीने लागू झाली असून ज्या व्यापारी, आयातदार, प्रक्रियादारांकडे मर्यादेपेक्षा जास्त साठा आहे त्यांनी १२ जुलैपर्यंत साठा मर्यादेत आणावा, अशा सूचनाही सरकारने दिल्या आहेत. 

केंद्र सरकारने तूर आणि हरभऱ्यावर शुक्रवारी (ता.२२) स्टाॅक लिमिट लावले. यात काबुली हरभऱ्याचाही समावेश आहे. घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, मोठ्या विक्री साखळ्या, प्रक्रियादार आणि आयातदारांवर ३० सप्टेंबरपर्यंत स्टाॅक लिमिट असणार आहे. तूर आणि हरभऱ्याची साठेबाजी आणि अवास्तव सट्टेबाजी होण्याला यामुळे आळा बसेल आणि ग्राहकांना रास्त भावात उपलब्ध होतील, असे ग्राहक व्यवहार विभागाने म्हटले आहे. 

सरकारने आयात तूर आणि हरभऱ्याचा साठा आयातदारांनी ४५ दिवसांपेक्षा अधिक दिवस ठेऊ नये, अशाही सूचना केल्या आहेत. तसेच जर साठा मर्यादेपेक्षा जास्त साठा असेल तर घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, आयातदार, प्रक्रियादार आणि विक्री साखळ्यांनी आपल्याकडील तूर आणि हरभऱ्याचा साठा १२ जुलैपर्यंत साठा मर्यादेच्या पातळीत राहील याची काळजी घ्यावी, असेही सरकारने म्हटले आहे. 

सरकारने म्हटले आही की, तूर आणि हरभऱ्यावर साठा मर्यादा लावण्याचा निर्णय या दोन्ही कडधान्याचे भाव कमी करण्यासाठी घेण्यात आला. कडधान्य मूल्यसाखळीत काम करणाऱ्या सर्वच घटकांना जाहीर केलेल्या साठ्यावर ग्राहक व्यवहार विभाग बारकाईने लक्ष ठेऊन आहे. 

किती आहे साठा मर्यादा?

सरकारने घाऊक व्यापाऱ्यांसाठी तूर आणि हरभरा साठ्याची मर्यादा २०० टन ठेवली आहे. तर किरकोळ व्यापाऱ्यांसाठी ५ टन तसेच विक्री साखळीच्या प्रत्येक आऊटलेटसाठीही ५ टनांची मर्यादा आहे. तर या आऊटलेटच्या गोदामासाठी २०० टनांची मर्यादा घातली आहे. प्रक्रियादारांसाठी मागील तीन महिन्यांच्या उत्पादनाची क्षमता किंवा एकूण वार्षिक क्षमतेच्या २५ टक्के, यापैकी जे जास्त असेल तेवढी मर्यादा घालण्यात आली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT