Soybean Market
Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : परभणीत सोयाबीनला मिळतोय कमाल ४७५० रुपयांचा दर

माणिक रासवे

Parbhani Rate : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. १२) सोयाबीनची २५० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४३०० ते कमाल ४७५० रुपये, तर सरासरी ४५२५ रुपये दर मिळाले.

परभणी बाजार समितीत सध्या स्थानिक परिसरातून सोयाबीनची आवक सुरू आहे. दरात किंचित चढ- उतार सुरू आहेत. शुक्रवार (ता. ५) ते शुक्रवार (ता. १२) या कालावधीत सोयाबीनची १ हजार १२२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ४३५० ते ४६५० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. १०) सोयाबीनची १८५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४४०० ते कमाल ४६७५ रुपये, तर सरासरी ४६५० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ९) सोयाबीनची २६१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४४०० ते कमाल ४६५० रुपये तर सरासरी ४६०० रुपये दर मिळाले.

सोमवारी (ता.८) सोयाबीनची १५८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४४०० ते कमाल ४५०० रुपये, तर सरासरी ४४५० रुपये दर मिळाले.

रविवारी (ता.७) सोयाबीनची १६८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४४०० ते कमाल ४५२५ रुपये, तर सरासरी ४५०० रुपये दर मिळाले.शुक्रवारी (ता. ५) सोयाबीनची १०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४२५० ते कमाल ४५०० रुपये, तर सरासरी ४३५० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो संसार उघड्यावर

Turtle Conservation Issue : रायगडमध्ये तापमानवाढीमुळे कासवसंवर्धन संकटात

Forest Fire Himachal : उत्तराखंडसारखीच आगीमुळे हिमाचलची अवस्था, भाजपचा हल्लाबोल, गावकऱ्यांचा इशारा

Summer Heat : उष्णता वाढली पारा ४५ अंश सेल्सिअसवर

Agrowon Podcast : गव्हाच्या भावात सुधारणा ; कापूस, सोयाबीन, हळद, तसेच काय आहेत गहू दर ?

SCROLL FOR NEXT