Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीन तीन कारणांमुळे पुन्हा घसरले; आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंडच्या भावात मोठी घट

Anil Jadhao 

Pune News : चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चांगली वाढ झाली होती. पण शुक्रवारी सोयाबीनच्या भावात ३ टक्क्यांनी आणि सोयापेंडच्या भावात ५ टक्क्यांची घट झाली. चालू आठवड्यात सोयाबीनचे भाव वाढण्याला जे देश जबाबदार होते, त्याच देशांमधील दोन घडामोडी प्रामुख्याने शुक्रवारी भाव पडण्यालाही जबाबदार ठरल्या. 

सुरुवातीला आपण सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारात एकाच दिवसात काय घटलं ते पाहू… आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव २५ जानेवारीला जवळपास १२.४५ डाॅलरवर होते. पण २६ जानेवारीला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन १२.०९ डाॅलरपर्यंत घसरले.

म्हणजेच एका दिवसाच्या काळात सोयाबीनच्या भावात तब्बल ३ टक्क्यांची घट झाली. तर सोयापेंडच्या भावात ५ टक्क्यांची घट झाली. सोयापेंडच्या भावाने मागील दोन वर्षांमधील निचांकी पातळी गाठली. चालू आठवड्यातच भाव वाढल्यानंतर बाजारात सकारात्मक वातावरण तयार होत होते. पण आठवड्याच्या शेवटी त्यावर पाणी फिरले. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव पुन्हा पाडण्याला दोन कारण आहेत. त्यातलं पहिल कारण म्हणजे अर्जेंटीना. अर्जेंटीनात यंदा सोयाबीन उत्पादनात चांगली वाढ होणार आहे. मागील हंगामात अर्जेंटीनात दुष्काळ होता. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. पण यंदा अर्जेंटीनात चांगली पाऊस झाला असून उत्पादन वाढीचीही शक्यता आहे. आतापर्यंत अर्जेंटीनात ५०० लाख टन उत्पादनाचा अंदाज होता. 

गुरुवारी अर्जेंटीनाच्या ब्यूनस आयर्स एक्सचेंजने अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज वाढवला आणि ५२५ लाख टनांवर नेला. म्हणजेच अर्जेंटीनात विक्रमी उत्पादन होणार, असा म्हटले आहे. आता अर्जेंटीना जागतिक पातळीवर सोयापेंड आणि सोयातेल निर्यातीत आघाडीवर असल्याने भाव कमी झाले. याचा सर्वाधिक परिणाम सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावावर झाला. 

दुसरं कारण ठरला ब्राझील. चालू आठवड्यातच ब्राझीलमध्ये उत्पादकता कमी राहील, असा अंदाज आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले होते. पण आता ब्राझीलमध्ये सोयाबीन काढणी सुरु झाली. काढणीचा वेग जास्त आहे.

काढणी सुरु झाल्याने शेतकरी सोयाबीन विक्री करत आहे. आधीच भावावर दबाव असल्याने त्यातच शेतकऱ्यांची नव्या मालाची विक्री सुरु झाल्याचा दबाव भावावर आला. ब्राझीलमध्ये सोयाबीचे भाव कमी झाले होते. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरही दिसून आला. कारण ब्राझील सोयाबीन उत्पादनात जगात आघाडीवर आहे. 

ब्राझील आणि अर्जेंटीनातील घडामोडींसह सध्या जगात तीन भागात युध्द आणि तनावाची परिस्थिती आहे. रशिया- युक्रेन, इस्त्राईल आणि हमास तसेच आपल्या शेजारी पाकिस्तान आणि इराण यांच्यात तणाव सुरु आहे. याचाही परिणाम सोयाबीन, सोयापेंड आणि सायातेलाच्या भावावर दिसून येत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT