Chana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Akola APMC Market : सोयाबीन, तूर, हरभरा आवक स्थिर

Kharif Season : खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके, पेरणी आदींसाठी लागणाऱ्या खर्चासाठी निधी उभारणे गरजेचे असते.

Team Agrowon

Akola News : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीन, तूर, हरभरा या मुख्य शेतीमालांची आवक स्थिर आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता भासत असून, त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या साठविलेल्या शेतीमालाची विक्री करण्याकडे वळाले असल्याचे दिसून येत आहेत.

खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके, पेरणी आदींसाठी लागणाऱ्या खर्चासाठी निधी उभारणे गरजेचे असते. त्यामुळे जरी सध्याचे बाजारभाव काहीसे स्थिर असले, तरी आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना शिल्लक माल विकावा लागत आहे.

बाजार समितीत सध्या सोयाबीन कमाल ४२८५, किमान ३५५० आणि सरासरी दर ४०६० रुपये एवढा मिळतो आहे. बाजारातील आवक दोन हजार क्विंटलवर आहे. तुरीचे दर ६०३० ते ७३४० दरम्यान आहेत. दीड हजार क्विंटलपर्यंत आवक आहे.

तर हरभऱ्याचे दर ४६०० ते ५४३० पर्यंत मिळत आहेत. दोन हजार क्विंटलवर आवक होत आहे. या दरांमध्ये मागील काही आठवड्यांपासून फारसा बदल झालेला नाही. दर स्थिर असल्याने काही शेतकरी बाजाराच्या स्थितीकडे पाहून वाट बघण्याच्या भूमिकेत आहेत, तर काही शेतकरी आर्थिक अडचणीमुळे तत्काळ विक्री करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या या आर्थिक गरजांचा विचार करून शासनाने वेळेवर पीककर्ज, सवलतीत बियाणे आणि इतर शेतीसामग्री उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांवरील तातडीच्या विक्रीचा ताण काहीसा कमी होऊ शकतो, असे जाणकार मत व्यक्त करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT