Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर सुधारले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. मात्र देशातील सोयाबीन दर मागील काही दिवसांपुर्वी नरमले होते. ते आजपर्यंत स्थिर आहेत. पण आता देशातील सोयाबीन उत्पादकांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात (Soybean Rate Today) आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. मात्र देशातील सोयाबीन दर मागील काही दिवसांपुर्वी नरमले होते. ते आजपर्यंत स्थिर आहेत. पण आता देशातील सोयाबीन उत्पादकांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता सोयाबीनचे दर सुधारण्याची शक्यता निर्माण झाली. पण सोयाबीनचे दर कधी सुधारतील? दरात किती वाढ होऊ शकते?

आंतररराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे जवळपास १ टक्क्याने सुधारून १४.४८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयातेलाच्या वायद्यांमध्ये जवळपास दीड टक्क्याने वाढ झाली होती. आज सोयातेलाचे वायदे ६३.४३ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. मागील आठवड्यात सोयातेल जवळपास ११ टक्क्यांनी पडले होते. मात्र किमान पातळीवरून सोयातेलाच्या दरात आता सुधारणा दिसून येत आहे.

सोयापेंडचे दरही आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारले आहेत. सोयापेंडचे दर जवळपास सव्वा टक्क्याने वाढले. आज सोयापेंडचे वायदे ४३३.३५ डाॅलर प्रतिटनाने पार पडले. देशात सध्या सोयाबीन नरमल्याने सोयापेंडचे दरही कमी झाले आहेत. म्हणजेच एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर वाढत आहेत. तर देशात दर कमी झाले. त्यामुळे देशातून सोयापेंड निर्यातही वाढली आहे.

दुसरीकडे पामतेलाच्या दरातही आज  सुधारणा पाहायला मिळाली. पामतेलाचे वायदे आज ३ हजार ९२७ रिंगीट प्रतिटनावर बंद झाले. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. बाजारातील अनेक विश्लेषक पामतेल यंदा दबावात राहील असा अंदाज व्यक्त करत होते. मात्र महत्वाच्या पामतेल उत्पादक देशांमध्ये उत्पादन घटीची शक्यता आहे.

इंडोनेशिया सध्या जैवइंधनामध्ये ३० टक्के पामतेलाचा वापर करत आहे. यापुढे जाऊन इंडोनेशियाने ३५ टक्के तेल वापरण्याचे उद्दीष्ट जाहीर केले होते. आता इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी ३५ टक्के पामतेल वापरासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. म्हणजेच इंडोनेशिया जैवइंधनात पामतेलाचा वापर जास्त करणार आहे. त्यामुळे पामतेलाची उपलब्धता कमी होईल. या बातमीनंतर पामतेलाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. इंडोनेशियाने हे धोरण राबविल्यास पामतेलाच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास सोयातेलाचे दरही सुधारु शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

देशात आज सोयाबीनचे दर काहीसे स्थिर होते. बाजारात आज जवळपास अडीच लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. तर सोयाबीनला आजही ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये सरासरी दर मिळाला. काही बाजारांमध्ये दर यापेक्षा जास्त होता. मात्र अशा बाजारांची संख्या नगण्य आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर आजही ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयातेलाचे दर वाढीसाठी काही घटक अनुकूल दिसत आहेत. त्यामुळे देशातील सोयाबीन बाजारालाही आधार मिळू शकतो. त्यामुळे सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT