Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीनच्या दरात २०० रुपयांची सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडेच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोयाबीन आणि सोयापेंडेचे दर शुक्रवारच्या तुलनेत काहीसे कमीच होते.

टीम ॲग्रोवन

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन (Soybean), सोयातेल आणि सोयापेंडेच्या दरात (Soymeal Rate) चढ-उतार पाहायला मिळाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोयाबीन (Soybean Rate) आणि सोयापेंडेचे दर शुक्रवारच्या तुलनेत काहीसे कमीच होते. तर सोयातेलाच्या दरानं (Soya Oil Rate) काहीशी उभारी घेतली होती. पण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर का नरमले होते? देशातील बाजारात सोयाबीनला काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.

चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून बाजार सुरळीत सुरु होईल, अशा बातम्या दोन दिवसांपूर्वी आल्या होत्या. चीनमधील कोरोना निर्बंध कमी होऊन सोयाबीन बाजाराला आधार मिळेल, अशी अपेक्षा शुक्रवारी व्यक्त केली जात होती. त्यामुळे बाजार सुधारला होता. मात्र काल चीनमध्ये मागील सहा महिन्यांतील सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याचा मानसिक परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर जाणवला.

आज सोयाबीनच्या दरात सुरुवातीच्या टप्प्यात मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र नंतरच्या काळात दराने उभारी घेतली. सोयाबीनच्या वायद्यांनी १४.६१ डाॅलर प्रतिबुशेल्सचा टप्पा गाठला होता. तर सोयातेलाचे दर शुक्रवारच्या तुलनेत काहीसे सुधारत ७७.४० सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. सोयापेंडेच्या दरानेही आज काहीशी उभारी घेतली. आज सोयापेंडचे दर प्रतिटन ४२०.८५ डाॅलर प्रतिटनावर पोचले होते.

देशातील बाजारातही आज सोयाबीनच्या दरात १०० ते २०० रुपयांची सुधारणा झाली. सोयाबीनचा सरासरी दर ५ हजार ४०० रुपयांवर पोचला. तर काही बाजार समित्यांमध्ये बियाणे गुणवत्तेच्या मालाचे दर ५ हजार ५०० रुपयांवरही पोहोचले होते. देशातील प्रक्रिया प्लांट्सकडून खरेदी वाढल्याने देशातील बाजारात आजही सुधारणा पाहायला मिळाली. सध्या सोयाबीनचे दर वाढत आहेत. मात्र पुढील काळात दरात काहीसे चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Farming: मका पिकात लष्करी अळीचे संकट कायम

Vegetable Farming: रोहीपिंपळगाव शिवार झाले भाजीपाला पिकांचे हब

Onion Import: बांगलादेशकडून कांद्याच्या आयातीवर पुन्हा निर्बंध

Women Empowerment: देशातील ७४४ ग्रामपंचायती महिला स्नेही होणार

Watermelon Farming: खानदेशात आगाप कलिंगडास फटका

SCROLL FOR NEXT