Soybean Procurement  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : बुलडाणा जिल्ह्यात ३२ हजारांवर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीविना

Soybean Market : शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी केल्यानंतरही खरेदीतील उणिवा समोर आल्याने जिल्ह्यातील सुमारे ३२ हजारांवर शेतकऱ्यांना हमीभावाने सोयाबीन विकता आलेले नाही.

Team Agrowon

Buldana News : शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी केल्यानंतरही खरेदीतील उणिवा समोर आल्याने जिल्ह्यातील सुमारे ३२ हजारांवर शेतकऱ्यांना हमीभावाने सोयाबीन विकता आलेले नाही. शासनाने पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीन खरेदी बंद केली असून या शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दराने आपला माल विकण्याशिवाय पर्याय नाही.

यावर्षी खुल्या बाजारात सोयाबीनचा दर चार हजारांच्या आत आलेला असल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर माल विक्रीसाठी नावनोंदणी केली होती. जिल्हयात ९० हजार ९४९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५८५१९ शेतकऱ्यांची १३ लाख २७ हजार ५८८ क्विंटल सोयाबीन खरेदी होऊ शकली.

कधी बारदाना नसल्याने, कधी मुदत संपल्याने तर सुरवातीला ओलाव्याच्या कारणाने शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात अडथळे आले. आता तर ६ फेब्रुवारीपासून खरेदी थांबविलेली आहे. तसेच यातील बराच माल गोदामात साठवल्या गेलेला नसल्याने चुकारे थांबलेले आहेत. जागा कमी असल्याने माल खाली करण्यासाठी वाहने वेअरहाऊस समोर उभे आहेत.

सर्वाधिक खरेदी लोणारमध्ये

जिल्ह्यातील लोणार तालुक्यात हमीभावाने सर्वाधिक तीन लाख ३३ हजार ८८७ क्विंटल सोयाबीन खरेदी झाले. १४ हजार ९४६ शेतकऱ्यांचा हा माल होता. तर मलकापूर तालुक्यात सर्वात कमी १६ हजार ११८ क्विंटल सोयाबीन ९२३ शेतकऱ्यांनी विकले.

तालुकानिहाय सोयाबीन खरेदी

बुलडाणा ८४ हजार ३५४ क्विंटल, मोताळा ६१ हजार ४५५, नांदुरा ५३०८८, मलकापूर १६११८, संग्रामपूर ३२७६०, जळगाव जामोद ४१४६५, खामगाव ३२३८१, शेगाव ७१६८७, लोणार तीन लाख ३३ हजार ८८७, मेहकर दोन लाख ३२ हजार ०९३, सिंदखेडराजा एक लाख ९३ हजार ६५८, देऊळगावराजा ४०७६३ क्विंटल सोयाबीन खरेदी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT