मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market Rate : चार महिन्यांपासून सोयाबीनचे दर स्थिरच

Soybean Bajar Bhav : खरीप हंगामाच्या तोंडावर भाववाढ होऊन दोन पैसे अधिक मिळतील असा बहुतांश शेतकऱ्यांचा अंदाज असतो.

Team Agrowon

Washim News : मागील चार महिन्यांपासून सोयाबीनचा भाव पाच हजारांवरच स्थिरावले असून खरिपाच्या तोंडावर दरात सुधारणा होईल, अशी आशा ठेवलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. सोयाबीन साठवणूक केलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

खरीप हंगामाच्या तोंडावर भाववाढ होऊन दोन पैसे अधिक मिळतील असा बहुतांश शेतकऱ्यांचा अंदाज असतो. जूनमध्ये सोयाबीनसह इतर खरीप मालाची भाववाढ होत असल्याचा अनुभव दरवर्षी शेतकऱ्यांना येतो. परंतु यावर्षी सात हजारांवर भाव मिळेल या आशेने सोयाबीन साठवणूक केलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

अजूनही सोयाबीन विकावे की ठेवावे अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. खरिपाच्या पेरणीसाठी तजवीजसाठी आता काही शेतकरी सोयाबीनची विक्री करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्यावेळी ऐन काढणीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते.

यातून शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून दरात सुधारणा होण्याच्या अपेक्षेने सोयाबीन राखून ठेवले होते. त्यामुळे मागील हंगामात सोयाबीनला दहा हजारांच्या आसपास भाव मिळाला होता.

यावर्षीही खरिपाच्या तोंडावर दरात सुधारणा होऊन किमान सात हजारांपेक्षा जास्त भाव मिळेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु मागील चार ते पाच महिन्यांपासून सोयाबीनचे दर पाच हजारांवरच स्थिरावले आहेत. अद्याप अनेक शेतकरी दर सुधारण्याच्या अपेक्षेने सोयाबीन विक्रीसाठी थांबलेले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT