Soybean Rate
Soybean Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीनचे दर वाढले की घटले?

अनिल जाधव

अनिल जाधव

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात आज पामतेल (Palm Oil), सोयाबीन (Soybean) आणि सोयातेलाच्या (Soya Oil) दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. तसेच पामतेलाच्या दरात सुधारणा झाल्याने इतर खाद्यतेलाचे (Edible Rate) दर वाढले होते. तर गेल्यावर्षीपेक्षा यंदा देशातून सोयापेंड निर्यात वाढत आहे. त्यामुळे देशातील सोयाबीन दराला आधार मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनचे दर काहीसे सुधारले होते. सोयाबीनचे वायदे १४.३१ डाॅलर प्रतिटनाने पार पडले. तर सोयातेलाच्या वायद्यांनी ७१.१८ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. तसेच सायोपेंडच्या वायद्यांनीही ४०६.७५ डाॅलर प्रतिटनाचा टप्पा गाठला होता. कालच्या तुलनेत सोयाबीन आणि सोयापेंडचे दर जवळपास स्थिर होते. मात्र दिवसभर दरातील चढउतार सुरु राहीले.

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीचा देशातील सोयाबीन दरावरही परिणाम होत आहे. देशात आज जवळपास २ लाख क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. म्हणजेच कालच्या तुलनेत देशातील बाजारातील आवक कमी झाली होती. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन आवक झाली होती. तर मध्य  प्रदेशातील आवक आज घटलेली दिसली. महाराष्ट्रात आज जवळपास ७० हजार टन सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं. तर मध्य प्रदेशातील आवक ६० हजार क्विंटलच्या दरम्यान होती. राजस्थानमधील आवक ३० हजार क्विंटलवर पोचली.

…………..
आजची दरपातळी

देशातील बाजारात आवक घटल्याचा सकारात्मक परिणाम सोयाबीन दरावर पाहायला मिळाला. आज देशातील सोयाबीन दरात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली होती. महाराष्ट्रातील सोयाबीनला आज ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर मध्य  प्रदेशातील सरासरी दरपातळी ५ हजार ३५० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती. तर राजस्थानमध्येही या दरम्यानच दर मिळाला.

………….
प्रक्रिया प्लांट्सचे दर

प्रक्रिया प्लांट्सचे दर महाराष्ट्रात क्विंटलमागे सरासरी ५० रुपयाने वाढले होते. आज प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ८०० ते ५ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. तर मध्य प्रदेशातील प्रक्रिया प्लांट्सच्या दराने ५ हजार ६०० ते ५ हजार ७०० रुपयांचा टप्पा गाठला होता. प्रक्रिया प्लांट्सचे दर वाढल्याने बाजार समित्यांधील दराला आधार मिळाला होता.

……….
पामतेलाचे दर

आंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजारात पामतेल, सोयातेलाच्या दरातही काहीशी सुधारणा झाली होती. पामतेलाचे दर सुधारल्याचा आधार इतर खाद्यतेल बाजाराला मिळतोय. पामतेलाच्या दरात आज टनामागे १०० रिंगीटची सुधारणा झाली. पामतेलाचे वायदे ४००४ रिंगीटने पार पडले. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे.

…………….
बाजाराला कशाचा आधार?

देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरु आहे. त्यातच केंद्राने स्टाॅक लिमिट काढल्यानंतर बहुतेक स्टाॅकिस्टनी साठा केला आहे. मात्र देशातून सोयापेंड निर्यात वाढण्याचा अंदाज आहे. यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत  सोयापेंड निर्यातीची गती चांगली आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो. शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT