soybean rate  agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सुधारले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज सुधारणा झाली होती. सोयाबीनसोबतच सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात वाढीचा ट्रेंड होता.

अनिल जाधव

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) आज सुधारणा झाली होती. सोयाबीनसोबतच सोयातेल (Soya Oil) आणि सोयापेंडच्या दरात (Soymeal Rate) वाढीचा ट्रेंड होता. आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्याने देशातही सोयाबीन दरात काहीशी सुधारणा दिसली. मात्र सरासरी दर स्थिर होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा झालेली दिसली. युक्रेनच्या सैन्याने काळा समुद्राच्या परिसरातील रशियाच्या सैन्य ठिकाणावर हल्ला केल्याचा दावा करत रशियाने युक्रेनबरोबर निर्यात सुरु ठेवण्याचा करार मोडला. रशियाने युक्रेनधून होणारी निर्यात पुन्हा थांबवली. त्यामुळे सूर्यफुल तेलाचा पुरवठा पुन्हा ठप्प होण्याचा अंदाज व्यक्त होतेय. तसंच यावर तोडगा कधी निघेल, याविषयी सांगता येत नाही. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल आणि तेलबियांच्या दरात पुन्हा सुधारणा झाली.

आज सोयाबीनच्या दरात जवळपास ८ सेंटची सुधारणा होत दर १४.०९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले. बाजार उघडला तेव्हा सोयाबीन दराने १४.१९ डाॅलरपर्यंत उसळी घेतली होती. नंतर दरात करेक्शन झाले. आज सोयाबीनच्या दराने सकाळच्या सत्रात मोठी झेप घेतली होती. सोयापेंडचे दर ४३६ डाॅलर प्रतिटनावर पोचले होते. मात्र नंतरच्या सत्रात त्यात घट होत ४२९.४० डाॅरवर स्थिरावले. सोयातेलाचेही दर जवळपास २ टक्क्यांनी वाढून ७३.४० सेंट प्रतिपाऊंडवर पोचले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडचे दर वाढल्याने इतरही तेलबिया दराच्या सुधारणा झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात वाढ झाल्याने देशातही दर काहीसे सुधारले होते. प्रक्रिया प्लांट्सच्या दरात क्विंटलमागे २५ ते ५० रुपयांची वाढ झाली होती. तर काही बाजार समित्यांमधील दरातही ५० रुपयांपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली.

यंदा सोयाबीन बाजार मागील महिनाभरापासून काहीसा दबावात आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन काढणी झाल्याबरोबर विक्रीला प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र सध्या पैशांची गरज असलेले शेतकरीच पूर्ण सोयाबीन विकत आहेत. तर इतर शेतकरी टप्प्याटप्याने विक्रीला प्राधान्य देत असल्याचे शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीतून कळाले. सध्या देशातील बाजारात सोयाबीन ४ हजार ७०० ते ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. मात्र ओलावा आणि काडी-कचरा जास्त असलेल्या मालाचे दर ४ हजार २०० रुपयांपासून सुरु होत असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

सध्या सोयाबीनचे दर दबावात दिसत असले तरी हे दिवस काढणीचे आहेत. त्यामुळे बाजारात आवक वाढणार आहे. त्यामुळे दर दबावात असल्याचे जाणकारांनी सांगितले. मात्र एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनला ५ ते ६ हजारांच्या दरम्यान दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री बाजाराचा आढावा घेऊन आणि टप्प्याटप्प्याने केल्यास फायदेशीर ठरेल, असंही जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price Demand: साताऱ्यात ऊसदराचा तिढा चिघळला; पहिली उचल जाहीर करण्याची मागणी

Indian Agriculture Export: भारतीय शेतीमाल निर्यातीला वाढती संधी

Warana Sugar Factory: ‘वारणा’चा गळीत हंगाम सुरू; यंदा १३ लाख टन गाळपाचे लक्ष्य

Agniveer Recruitment: २८२ नौदल अग्निवीरांना पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Sangli District Bank: सांगली जिल्हा बँकेच्या १५ जागा बिनविरोध; सहा जागासाठी निवडणूक

SCROLL FOR NEXT