Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean MSP : सोयाबीनचा हमीभाव यंदाही मृगजळच

Soybean Rate : सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असून, स्थानिक बाजार समितीत दररोज १५ हजार पोत्यांची आवक नोंदविण्यात येत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असून, स्थानिक बाजार समितीत दररोज १५ हजार पोत्यांची आवक नोंदविण्यात येत आहे. हमीदराने सोयाबीन खरेदीचे शेतकऱ्यांचे स्वप्न मात्र खुल्या बाजारात मिळणाऱ्या दरांमुळे मृगजळ ठरू लागले आहे. सध्या सोयाबीनला सरासरी चार हजार रुपये इतकाच दर मिळू लागला आहे.

खरीप काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे दररोज बाजार समितीमध्ये दहा ते पंधरा हजार पोत्यांची आवक आहे. यंदा चांगला भाव मिळेल ही आशा बाजारातील दर बघता फोल ठरली आहे.

शुक्रवारी (ता.१४) येथील बाजार समितीत १४ हजार ४९५ पोत्यांची आवक नोंदविण्यात आली. या सोयाबीनला ३८५० ते ४१९६ रुपये भाव मिळाला. सरासरी ४ हजार २३ रुपये हा दर राहिला आहे. ७ ऑक्टोबरपासून १६ नोव्हेंबरपर्यंत २ लाख ८७ हजार क्विंटल सोयाबीनची आवक अमरावती बाजार समितीत नोंदविण्यात आली आहे.

राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये निर्णय घेत हमीभावाने १३ लाख टन सोयाबीन खरेदी करण्याची घोषणा केली. मात्र येथील नाफेडच्या केंद्रावर आतापर्यंत ८० शेतकऱ्यांचे १ हजार ७३१ क्विंटल सोयाबीन या केंद्रांवर खरेदी झाले आहे. खुल्या बाजारात यापेक्षा अधिक सोयाबीनची आवक होत आहे.

नाफेडला केवळ एफएक्यू दर्जाचाच सोयाबीन हवा असल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे सोयाबीन या दर्जाचे नसल्याचे कारण देत परत पाठविण्यात येत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नाइलाजाने खुल्या बाजारात पडत्या दराने सोयाबीन विक्रीची वेळ आली आहे.

हमीभावाने खरेदीस खूपच मर्यादा असल्याने शेतकऱ्यांचा खुल्या बाजाराकडे ओढा आहे. सुगी सुरू झाल्यापासून आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांनी सुमारे एक लाख क्विंटलवर सोयाबीनची बाजारात आणले, मात्र त्यांना हमीभावा इतका दर न मिळाल्याने यंदाही आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले.

सोयाबीनमध्ये ओलावा आहे, दाणा बारीक आहे, अशी कारणे देत सोयाबीनचे दर पाडल्या जात आहेत. सोयाबीन एफएक्यू दर्जाचे नाही, अशी कारणे देत नाफेड परत पाठवते. केवळ नोंदणीवरच समाधान मानण्याची वेळ आली आहे. हमीदर यंदा मिळेल याची हमी नाही, त्याचबरोबर भावही वाढतील की नाही, हा प्रश्‍न आहे.
- ज्ञानेश्‍वर ठाकरे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Cultivation : कळंबा गटाअंतर्गत फळबाग लागवड सुरू

Voter Registration : नव्या २३,४७५ मतदारांची अहिल्यानगर जिल्ह्यात नोंद

Mango Cashew Damage : आंबा, काजू लागवडीची गवा-रेड्यांकडून नासधूस

Maharashtra Election 2024 : मतदारांतील ‘सुप्त’लाटेची उमेदवारांना धास्ती

Fertilizer Shortage : जळगावात खतांची लिंकिंग, टंचाई; खतबाजारात शेतकऱ्यांची लूट

SCROLL FOR NEXT