Soybean Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी तेलंगणात पूर्ण

Soybean Update : केंद्र सरकारने महाराष्ट्रात सर्वाधिक १४ लाख १३ हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट दिले. मात्र उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत झालेली खरेदी महाराष्ट्रातच कमी आहे.

Anil Jadhao 

Pune News : केंद्र सरकारने महाराष्ट्रात सर्वाधिक १४ लाख १३ हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट दिले. मात्र उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत झालेली खरेदी महाराष्ट्रातच कमी आहे. तेलंगणाने खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर मध्य प्रदेशने उद्दिष्टाच्या १९ टक्के खरेदी केली. मात्र महाराष्ट्रात केवळ १०.२६ टक्के खरेदी झाली. महाराष्ट्रात १७ डिसेंबरपर्यंत केवळ १ लाख ४५ हजार टन खरेदी करण्यात आली आहे.

‘नाफेड’ने दिलेल्या माहितीवरून हमीभावाने सोयाबीन खेरदी खूपच धिम्या गतीने सुरु असल्याचे स्पष्ट होते. आतापर्यंत देशभरात ५ लाख ५ हजार टनांची खरेदी झाली. तेलंगणात खेरदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. तर सर्वाधिक खरेदी मध्य प्रदेशात झाली. मध्य प्रदेशात २ लाख ५८ हजार तर महाराष्ट्रात केवळ १ लाख ४५ हजार टन सोयाबीन खरेदी केले.

केंद्र सरकारने यंदा देशात ३३ लाख ६० हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यापैकी सर्वाधिक उद्दिष्ट महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात खरेदीचे १४ लाख १३ हजार टन उद्दिष्ट आहे. त्यानंतर मध्य प्रदेशात १३ लाख ६८ हजार टन खरेदीचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच महाराष्ट्रात एकूण उद्दिष्टाच्या ४२ टक्के खरेदीचे उद्दिष्ट आहे. तर मध्य प्रदेशात एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत जवळपास ४१ टक्के उद्दिष्ट देण्यात आले. म्हणजेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये ८१ टक्के खरेदी केली जाणार आहे.

देशभरात १७ डिसेंबरपर्यंत ५ लाख ५ हजार टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली. सर्वाधिक खरेदी मध्य प्रदेशात झाली. मध्य प्रदेशात आतापर्यंत २ लाख ५८ हजार टनांची खरेदी झाली. तर महाराष्ट्रात १ लाख ४५ हजार ८०३ टनांची खेरदी झाली. तेलंगणात ५९ हजार ५०१ टन खरेदी झाली. तर गुजरातमध्ये १७ हजार ३१६ टन खरेदी झाली. राजस्थानमध्ये १५ हजार ४९० टन आणि कर्नाटकात ९ हजार ११० टनांची आतापर्यंत खरेदी झाली.

राज्यात केवळ उद्दिष्टच जास्त

सोयाबीन खरेदीसाठी राज्यात सर्वाधिक उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. राज्यात १४ लाख १३ हजार टन खरेदीचे उद्दिष्ट आहे. देशातील एकूण उद्दिष्टापैकी तब्बल ४२ टक्के खरेदीचे उद्दिष्ट महाराष्ट्रात ठेवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र राज्यात १ लाख ४५ हजार टनांचीच खरेदी झाली. म्हणजेच उद्दिष्टाच्या केवळ १०.२६ टक्केच खरेदी झाली.

तेलंगणात उद्दिष्ट पूर्ण

तेलंगणात सोयाबीनचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे तेलंगणात केवळ ५९ हजार ५०८ टनांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १७ डिसेंबरपर्यंत तेलंगणात ५९ हजार ५०१ टनांची खरेदी पूर्ण झाली होती. म्हणजेच तेलंगणाने आपले उद्दिष्ट पूर्ण केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT