Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीन आवकेत वाढ

Soybean Arrival Update : मागील चार दिवसांत सुमारे २० हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली आहे.

 गोपाल हागे

Akola News : बाजारात सध्या सोयाबीनच्या दरात कुठल्याही सुधारणेची शक्यता नसल्याचे पाहून शेतकरी सोयाबीन विक्रीला काढू लागले आहेत. यामुळेच आता दररोज आवक सुमारे पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक होत आहे. मागील चार दिवसांत सुमारे २० हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. २९) सोयाबीनची ५१०२ क्विंटलची आवक झाली होती. सध्या सोयाबीनचा किमान दर ३५७५, तर कमाल दर ४४५० रुपये एवढा होता. ४१०० रुपये सरासरी दर मिळाला. सोयाबीनच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून स्थिरता आलेली आहे.

उलट मध्यंतरी किमान दर तीन हजारांच्या आत पोहोचला होता. आता सोयाबीन चांगल्या दर्जाचे येत असल्याने किमान दर ३५०० रुपयांवर गेला आहे. कमाल दरानेही ४४०० रुपयांचा पल्ला गाठला. मुळात हाही दर कमीच असल्याचे शेतकरी बोलत आहेत. परंतु बाजारात सध्या सोयाबीनच्या दरात कुठल्याही सुधारणेची शक्यता नसल्याने आजवर प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री सुरू केली.

शिवाय गेल्या आठवड्यापर्यंत निवडणूक रणधुमाळी सुरू राहल्यानेही आवकेवर परिणाम झालेला होता. आता मागील काही दिवसांत येथील बाजार समितीत दररोज साडेचार हजार ते पाच हजार क्विंटलपर्यंत आवक होत असल्याचे दिसून येत आहे.

कापूस सरासरी ७३९६ रुपये

अकोला बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार खरेदी केंद्रावर कापसाच्या आवकेतही सुधारणा होऊ लागली आहे. शुक्रवारी (ता. २९) बाजारात २०९५ क्विंटलची आवक नोंदविण्यात आली. कापसाला किमान दर ७३३१ रुपये आणि कमाल ७४७१ रुपयांचा भाव मिळाला. सरासरी ७३९६ रुपये दराने खरेदी व्यवहार झाला.

सोयाबीनची मागील चार दिवसांतील आवक
तारीख आवक (क्विंटल)
२६ नोव्हेंबर ४९६०
२७ नोव्हेंबर ५७३२
२८ नोव्हेंबर ५३१९
२९ नोव्हेंबर ५१०२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT