soybean rate  agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीन बाजार का सुस्तावला

चालू आठवड्यात सोयाबीन बाजारात काहीसे चढ उतार राहीले. या आठवड्यात अर्जेंटीना चर्चेत आलं होतं. अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये कमी पाऊस होता.

Team Agrowon

……….
अनिल जाधव

पुणेः सोयाबीन बाजारानं (Soybean Bajar) डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच नांगी टाकली. दर एका ठिकाणी ठाण मांडून बसले की काय? असा संशय येत आहे. पण शेतकऱ्यांनी कमी दरात सोयाबीन विकायचं (Soybean Market) नाही, असं ठरवलं. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री (Soybean Market Rate) कमी करून दरातील घसरण थांबवली. पण शेतकऱ्यांनाही दरवाढीची प्रतिक्षा आहे.

चालू आठवड्यात सोयाबीन बाजारात काहीसे चढ उतार राहीले. या आठवड्यात अर्जेंटीना चर्चेत आलं होतं. अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये कमी पाऊस होता. त्यामुळं पिकाला फटका बसतो आहे. परिणामी अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा सकारात्मक परिणाम सोयाबीन बाजारावर होताना दिसत आहे.

दुसरं म्हणजे, चीन सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक आहे. मात्र चीनमध्ये पुन्हा लाॅकडाऊनचं संकट ओढावलं. त्यामुळं येथील बाजारातून सोयाबीनला मागणी कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. पण सध्यातरी स्थिती बिघडलेली नाही. तरीही बाजाराचं लक्ष कोरोनाकडे आहे.

चालू आठवड्यात सोयाबीन बाजार तसा स्थिरच होता. आठवडाभर सोयाबीनचे व्यवहार ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान झाले. तर दुसरीकडे बाजारातील आवकही कमी होती. डिसेंबर महिन्यात एरवी दिवसाला ४ ते ५ लाख क्विंटलच्या दरम्यान आवक  होते. मात्र सद्या केवळ २ ते अडीच लाख टन आवक आहे. त्यामुळं सोयाबीनचे दर टिकून असल्याचं अभ्यासकांनी सांगितले.

………….
आंतरराष्ट्रीय बाजारातील दर
आंतरराष्ट्रीय बाजारातही चढ उतार राहीले. पण दरपातळीत मोठी वाढ दिसली नाही. सीबाॅटवर सोमवारी सोयाबीनचा  बाजार १४.६३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर सुरु झाला. म्हणजेच ४ हजार ४५० रुपयांवर बाजार खुला झाला. तर आठवडाभर दरात चढ उतार होत शुक्रवारी बाजार १४.८० डाॅलर म्हणजेच ४ हजार ५५० रुपयांवर बंद झाला. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. 

…………..
पुढील आठवड्यात काय घडू शकतं?
पुढील आठवड्यात मात्र सोयाबीन दराला आधार मिळू शकतो. इंडोनेशियानं जोनावरीपासून जैवइंधनात पामतेलाचा वापर वाढविण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं पामतेलाचे दर वाढू शकतात. यामुळे सोयाबीनचे दरही सुधारतील. तसेच पुढील आठवडाभर अर्जेंटीनात पाऊस पडला नाही तर येथील उत्पादनात जास्त घट होईल. यामुळेही सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो, असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Digital Fertilizer Sale : शेतकऱ्यांसाठी खत खरेदी झाली आता डिजीटल

Sugar Factory : सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा देशपातळीवर डंका

Dushkali Dahi Handi : शेतकरी पुत्रांची दुष्काळी दहीहंडी

E-Pik Pahani : डिजिटल पीकपेरा नोंदणीचे काम संथ गतीने

Tiger Attack : खत टाकताना वाघाची शेतकऱ्यावर झडप

SCROLL FOR NEXT