Cashew Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Season: "काजू हंगामाची संथ सुरुवात! ओला काजूगर १४०० तर कच्ची बी २०० प्रतिकिलो"

Cashew Market Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगामाला धीम्यागतीने सुरुवात झाली असून काजू बीच्या दरासोबत आता ओल्या काजू गराला देखील चांगला दर मिळत आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगामाला धीम्यागतीने सुरुवात झाली असून काजू बीच्या दरासोबत आता ओल्या काजू गराला देखील चांगला दर मिळत आहे. ओल्या काजू गराला प्रतिकिलो १ हजार ४०० तर कच्च्या बीला शेकडा दोनशे रुपये दर मिळत आहे.

काजू हंगाम यावर्षी महिना दीड महिन्यांनी सुरू झाला. अजूनही काही भागातच काजू बी परिपक्व व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काजू बीला प्रतिकिलो १७० ते १८० रुपये दर मिळत आहे.

मात्र सध्या काजू उत्पादक ओल्या काजू आणि काजूगर विक्री करीत आहेत. ओला काजूगर प्रतिकिलो १ हजार ४०० रुपये तर शेकडा ३५० रुपयांनी विक्री करीत आहेत. तर ओली काजू बी शेकडा २०० रुपयांनी विक्री करीत आहेत.

जिल्ह्यातील सर्व स्थानिक बाजारपेठांमध्ये काजूगर आणि काजू बी विक्रीसाठी आलेली दिसत आहे. ओल्या काजूगराला मुंबई, पुणे, कोल्हापूर यासह स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. ओला काजू बी फोडून घेण्यासाठी महिलांना शेकडा ५० रुपये दिले जातात.

गेल्या काही वर्षांत काजू बीच्या दरात चढउतार आले. त्यामुळे आम्ही गेल्या एक दोन वर्षांपासून ओली काजू बी, ओले काजूगर विक्री करतो. मुंबई, पुणे येथून चांगली मागणी मिळत आहे.
राजू पवार, काजू उत्पादक, एडगाव, ता. वैभववाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Farming: वाशीममध्ये रब्बी लागवड ८२ टक्क्यांवर

Farmer Empowerment: तंत्रज्ञानातून आपला शेतकरी मजबूत होणार

Book Review: कृषी क्षेत्रातील नॅनोतंत्रज्ञानाची ओळख

Cotton Crop Damage: प्रतिकूल हवामान, गुलाबी बोंडअळीचा मोठा फटका! कापूस पीक काढून शेतकरी हरभरा पेरणीकडे वळले

Alaknanda Galaxy: ‘अलकनंदा’च्या निमित्ताने...

SCROLL FOR NEXT