Sugar Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Market : पावसाचे आगमन लांबल्याने साखरेच्या मागणीत काहीशी वाढ

Sugar Industry : पावसाळा सुरू होण्यास विलंब लागण्याच्या शक्यतेचा फायदा साखर विक्रीला होणार आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : पावसाळा सुरू होण्यास विलंब लागण्याच्या शक्यतेचा फायदा साखर विक्रीला होणार आहे. देशात अजूनही मॉन्सूनने सुरुवात केली नाही. सध्या उन्हाळा तीव्र असल्याने जूनमध्येही साखरेला मागणी आहे. गेल्या चार दिवसांमध्ये साखरेच्या दरात थोड्या प्रमाणात वाढ होत आहे.

यंदा मे महिन्यात अपेक्षित साखर विक्री झाली नाही. उन्हाळा लांबल्याने पाऊस सुरू होईपर्यंत तरी साखरेची विक्री चांगली राहील, अशा अपेक्षेत कारखानदार आहेत. केंद्र शासनाने यंदा देशातील साखर कारखान्यांना जून महिन्यासाठी २३.५० लाख टनांचा साखर विक्री कोटा दिला आहे.

एप्रिलला तेजीत असलेले दर मेच्या उत्तरार्धात मात्र नरमले. पुढे पावसाळा असल्याने हे दर कमीच राहतील, अशा अपेक्षेत साखर कारखानदार होते. मात्र विविध हवामान संस्थांनी पावसाळा सुरू होण्यासाठी विलंब होईल, असा अंदाज दिला.

देशात बहुतांश ठिकाणी आता कोरडे हवामान आहे. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला असला तरी अजूनही पावसाने सुरुवात केली नाही. विशेष करून देशाच्या उत्तर भागात उन्हाळ्याची लाट तीव्र आहे.

साखरेची ६० टक्के विक्री ही शीतपेय व आईस्क्रीम उद्योगातून होत असते. मे च्या शेवटच्या आठवड्यापासून या घटकाकडून साखरेला मागणी वाढत असल्याचे साखर कारखानदारांनी सांगितले. फार मागणी नसली तरी थोड्या प्रमाणात तरी या उद्योगाने साखरेची मागणी नोंदवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने वाढवून दिलेल्या साखर कोट्याइतकी साखर विक्री करणे शक्य होणार आहे.

जूनचा विक्रीचा कोटा पूर्ण होण्याची आशा

सध्या ३४०० रुपये क्विंटलपर्यंत साखरेचे दर आहेत. प्रत्येक टेंडरला ५० ते ७० रुपये कमी-जास्त होत आहेत. पावसाने लवकर सुरुवात केल्यास जूनमध्ये साखरेची मागणी एकदम कमी होईल, अशी अपेक्षा साखर उद्योगाला होती.

सध्या तरी उन्हाळा लांबल्याने साखरेची विक्री नियमित असल्याचे चित्र आहे. आणखी काही दिवस जरी पाऊस लांबला तरी त्या कालावधीपर्यंत साखरेची विक्री करता येणे शक्य आहे. काही प्रमाणात तरी साखरेला मागणी असल्याने शासनाने जूनचा साखर विक्रीचा दिलेला कोटा पूर्ण करता येऊ शकेल, असा आशावाद कारखान्यांना आहे. साखर शिल्लक न ठेवण्याचा प्रयत्न अनेक कारखाने करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agristack Registration: छत्रपती संभाजीनगरमध्ये सव्वा लाखाहून अधिक शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रलंबित

Book Review: प्रादेशिक सिनेमांचा आस्वादक धांडोळा

Shades of History: इतिहासातील करडी छटा

Interview with Ashish Thackeray: बिगरजंगली बिबट्यांमुळेच संघर्ष वाढतोय

Ashtamudi Lake: एका कवितेची सत्तरी

SCROLL FOR NEXT