Cotton Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate Today: कापूसदरात किंचित वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूसदर ८५ सेंट प्रतिपाउंड असे होते. आंतरराष्ट्रीय बाजारात किंचिंत वाढ दिसत आहे.

Team Agrowon

जळगाव ः देशातील बाजारांत कापसाचे दर (Cotton Market) स्थिर असून, खंडीला (३५६ किलो रुई) सध्या ६३ हजार रुपयांवर दर आहेत. देशात कापूस आवकेत (Cotton Arrival) प्रतिदिन ३५ हजार गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) वाढ दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूसदर ८५ सेंट प्रतिपाउंड असे होते. आंतरराष्ट्रीय बाजारात किंचिंत वाढ दिसत आहे. याचाही चांगला परिणाम बाजारावर झालेला दिसत आहे. मागील आठवड्यात देशातील कापूस आवक प्रतिदिन एक लाख १० हजार गाठी होती.

त्यात मागील काही दिवसांत वाढ झाली असून, प्रतिदिन आवक सरासरी एक लाख ३४ ते एक लाख ३७ हजार गाठी अशी झाली आहे. देशातील कापड उद्योगाची चाकेही गतिमान होऊ लागल्याने गाठींना उठाव आहे. राज्यातील कापूस आवक प्रतिदिन २५ हजार गाठींवरून ३५ हजार गाठी झाली आहे.

राज्यात खेडा खरेदीत कापसाला किमान ८१०० व कमाल ९००० रुपये प्रतिक्विंटलचा दर सोमवारी (ता. ९) अनेक भागांत मिळाला. दर्जेदार किंवा लांब धाग्याच्या व चांगली शुभ्रता, कमी आर्द्रता असलेल्या कापसाला चांगले दर आहेत.

ज्या शेतकऱ्याकडे १०० क्विंटलवर कापूस आहे, त्यांच्याकडे काही खरेदीदारांनी ९३०० रुपयांपर्यंत खेडा खरेदीसंबंधी दरही दिला. यासंबंधीचे काही सौदेही खानदेशात सोमवारी झाल्याची माहिती आहे.

देशात दरवर्षी सुमारे ३०० ते ३१० लाख गाठींची मागणी वस्त्रोद्योगासह बिगर वस्त्रोद्योगात असते. यंदा ही मागणी २९५ लाख गाठी एवढी राहू शकते. यातच उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी दिसत आहे. यंदा उत्पादन ४०० लाख गाठी येईल, असा अंदाज सुरुवातीला किंवा जुलै-ऑगस्टमध्ये होता. पण अंदाज महिन्यागणिक बदलले.

आता देशात कापसाचे उत्पादन ३३५ लाख गाठी येईल. उत्तरेकडे (पंजाब, हरियाना व राजस्थान) १० लाख गाठींनी उत्पादन घटेल, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. महाराष्ट्रातील उत्पादनही ८० ते ८५ लाख गाठी एवढे राहू शकते. निर्यातीसंबंधी कार्यवाही सध्या दिसत नाही. परंतु स्थानिक क्षेत्रात मागणी येत असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दरात सरत्या रात्री किंचित तेजी दिसली आहे. पण ही तेजी वाढेल किंवा टिकून राहील का याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही. कारण निर्यात व वापर याबाबत अद्याप सकारात्मक स्थिती नाही. पण कापूस आवक देशात वाढत आहे.

- महेश शारदा, माजी अध्यक्ष, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT