Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Market : मुंबईत कोकणातून साडेसात हजार पेटी आंबा

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात आंब्याची विक्री वाशी बाजार समितीमधून केली जाते. त्यामुळे कोकणातील सर्वाधिक आंबा वाशीतच पाठविला जातो.

Team Agrowon

Mango Market Rate रत्नागिरी ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai APMC) गतवर्षीच्या तुलनेत येदा आंब्याची आवक (Mango Arrival) वाढली आहे. या आठवड्यात दररोज अकरा हजारांपेक्षा अधिक पेट्या दाखल होत आहेत.

त्यातील साडेसात हजार पेट्या कोकणातील असून, रत्नागिरी जिल्ह्यातील वीस टक्के पेट्यांचा समावेश आहे. रत्नागिरीतील आंब्याची आवक १५ मार्चनंतर वाढेल, असा अंदाज आहे. सध्या २ हजार रुपयांपासून ६ हजार रुपयांपर्यंत पाच डझनाच्या पेटीचा दर (Mango Rate) आहे.

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात आंब्याची विक्री वाशी बाजार समितीमधून केली जाते. त्यामुळे कोकणातील सर्वाधिक आंबा वाशीतच पाठविला जातो.

गेल्या काही वर्षांत कोरोनामुळे थेट विक्रीवर भर दिला जात असला तरीही अजूनही मोठा बागायतदार मध्यस्थांवरच अवलंबून आहे. या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस देवगडमधून मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात रवाना झाला.

तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्यांचे प्रमाण कमी आहे. चालू आठवड्यामध्ये सलग चार दिवस अकरा हजारांहून अधिक पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्या. गुरुवारी (ता. २) सकाळी आलेल्या अहवालानुसार ७ हजार ४३४ पेटी कोकणातून, तर ४ हजार ३०१ पेटी इतर राज्यांतून वाशीत दाखल झाली.

कोकणातून आलेल्या पेट्यांपैकी ८० टक्के देवगडमधून, तर उर्वरित वीस टक्के रत्नागिरीतून आल्याचे बाजार समितीमधून सांगण्यात आले. गतवर्षी मार्चच्या सुरुवातीला दीड हजार पेटी वाशीत येत होती.

तसेच यंदा फेब्रुवारीमध्येच आंबा दाखल झाला. त्यात सर्वाधिक देवगडचाच होता. ४ ते ८ डझनांची पेटी २ हजार ते ६ हजार रुपयांना विकली जाते. कर्नाटकमधून बदामी व लालबागचीही आवक होत आहे.

वाशीतील आवक सध्या वाढू लागली आहे. मार्चमध्ये त्यात आणखी वाढ होईल. त्यामुळे आंबा हंगाम या वर्षी चांगला होईल, अशी चिन्हे आहेत. आवक वाढत राहिली तर दरही सामान्य नागरिकांच्या नियंत्रणात येतील. सध्या हापूसला ग्राहकांचीही पसंती मिळत आहे.

- संजय पानसरे, संचालक बाजार समिती

आखातातील निर्यात सुरू

वाशी बाजारात येणाऱ्या पेट्यांपैकी पन्नास टक्के माल आखाती देशांमध्ये निर्यात केला जातो. यंदा लवकर आंबा आखातात पाठविण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे पाच हजारांहून अधिक पेट्या निर्यात होत आहेत. अन्य देशांमधील निर्यातही वेगाने वाढणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department: टॅब खरेदीच्या हालचाली शंकास्पद

Kharif Onion Cultivation: खरीप कांदा लागवड क्षेत्रात ५० टक्क्यांनी घट

Turmeric Crop Loss: देशातील हळदीला पावसाचे ग्रहण

Cotton MSP Procurement: कापसाची हमीभावाने एक ऑक्टोबरपासून खरेदी

Agriculture GST : जीएसटी परिषदेत १२ व २८ टक्के स्लॅब रद्द; शेती अवजारे, ट्रॅक्टर, ठिबकवर ५ टक्के जीएसटी

SCROLL FOR NEXT