Grape Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Grape Market : नोंदणीकृत व्यापाऱ्यांनाच द्राक्षांची विक्री करा

सध्या द्राक्ष विक्रीचा हंगाम सुरू आहे. व्यापाऱ्यांकडून फसवणूक होण्याचा धोका आहे.

Team Agrowon

Grape Market News सांगली : सध्या द्राक्ष विक्रीचा (Grape Season) हंगाम सुरू आहे. व्यापाऱ्यांकडून फसवणूक होण्याचा धोका आहे. तो टाळण्यासाठी पोलिस ठाणे, बाजार समिती यांच्याकडे नोंदणी असलेल्या व्यापाऱ्यांनाच द्राक्षांची विक्री (Grape Selling) करा, असे आवाहन राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या (Draksh Bagaytadar Sangh) पदाधिकाऱ्यांनी केले.

संघाच्या पुणे व सांगली विभागातर्फे द्राक्ष शिवारफेरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. वडगाव, सावळज, मणेराजुरी, निमणी, पलूस वाळवा या ठिकाणच्या शेतकऱ्यांना भेटी दिल्या.

त्यामध्ये राज्य संघ पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, उपाध्यक्ष कैलासराव भोसले, खजिनदार सुनील पवार, मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे, पुणे, सोलापूर, नाशिक, सांगली विभागाचे पदाधिकारी सांगली विभागाचे अध्यक्ष संजय बरगाले, सचिव प्रफुल्ल पाटील यांचा समावेश होता.

बरगाले म्हणाले, की शिवारफेरीत बागातील कामाचे नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन, संजिवके, खतांचा वापर, रोग व कीड व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.

द्राक्षे घेणारे काही व्यापारी फसवणूक करतात. नोंदणीकृत व्यापाऱ्यांकडे द्राक्षे विक्री करावी. गावातही सरपंच, ग्रामसेवक, प्रमुख शेतकरी यांची समिती करून व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवावे.

वडगाव येथे विजय देसाई, सावळज येथे शीतल पाटील, मणेराजुरी येथे सुरेश एकुंडे, निमणी येथे दिलीप पाटील, वाळवा येथे चंद्रशेखर शेळके, पलूस येथे विजय माळी यांच्या द्राक्ष प्लॉटला भेट देऊन माहिती घेण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: ज्वारीचा भाव टिकून; गवार तेजीत, जांभळाला उठाव, मुग दबावात, सोयाबीन दर मंदीत

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्यांना विलंब नको

Urea Shortage : युरियाच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी त्रस्त

Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’मधून वीजबिलात १२० रुपयांची सवलत

Khandesh Water Crisis : टँकर घटले; काही भागांत टंचाई कायम

SCROLL FOR NEXT