Exportable Grape production : निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात तयार केला हातखंडा

सांगली जिल्ह्यातील पळशी हे द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध गाव आहे. येथील अमित गुरव यांनी जिद्द, सचोटी, अनुभवी बागायतदारांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर निर्यातक्षम द्राक्षशेती यशस्वी केली आहे.
Exportable Grape production
Exportable Grape productionAgrowon
Published on
Updated on

सांगली जिल्ह्यातील (Sangali District) खानापूर तालुक्यातील पळशी हे दुष्काळाशी सामना करणारे गाव आहे. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर (Mountain) असून, शेती डोंगराळ, उताराची आहे.

पाण्याची कमतरता असल्याने खरीप आणि रब्बी हंगामातील (Kharif, Rabbi Season) पिकांशिवाय अन्य पिकांना मर्यादा होत्या. त्यामुळे कमी पाण्यात कोणते नगदी पीक घेता येईल याचा अभ्यास शेतकरी करीत होते.

सन १९९५-८६ च्या दरम्यान द्राक्षपीक (Grape Peek) गावात आले. हळूहळू अन्य शेतकरी अर्थकारण लक्षात घेऊन त्याकडे वळू लागले. सन १९९१-९२ पासून पळशीत (Grape) द्राक्ष बागा वाढू लागल्या.

वेळप्रसंगी टॅंकरने पाणी (Tanker Water) आणून शेतकऱ्यांनी बागा टिकवल्या. आज युरोपीय देशांमध्ये द्राक्षाची निर्यात करणारे गाव म्हणून पळशी वीस वर्षांहून अधिक काळ ओळखले जाते. यात बागायतदारांचे कष्ट वाखाणण्याजोगे आहेत.

खडतर प्रवास

गावातील अमित अर्जुन गुरव यांची निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक अशी ओळख आहे. त्यांची साडेदहा एकर शेती आहे. आजोबा गावचे सरपंच होते. अमित यांचे वडील सातवीत असतानाच आजोबांचे निधन झाले. आर्थिक परिस्थिती कमजोर झाली.

त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अमित यांच्या वडिलांवर आली. सातत्याने दुष्काळ असल्याने जगण्याची भ्रांत होती. त्यामुळे ते चेन्नईला गलाईच्या दुकानात (सोने-चांदी शुद्धीकरण प्रक्रिया) काम करू लागले. २५ ते ३० वर्षे हा अनुभव घेतला. इकडे गावी

शेती सुधारणांच्या कामातही ते मग्न होते. अकरा कूपनलिका घेतल्या. सन १९९२ मध्ये सतरा खांब उभारून विजेचे ‘कनेक्शन’ घेतले. निर्यातक्षम द्राक्षबाग तयार करून आर्थिक स्थैर्य मिळवण्याचे ठरवले.

द्राक्षशेतीची सूत्रे स्वीकारली

सन १९९८ मध्ये पाऊण एकरावर द्राक्ष बाग लागवड झाली. चांगल्या व्यवस्थापनाच्या जोरावर १९९८ पासून द्राक्षे युरोपीय देशांत पाठवण्यात यश मिळाले.

द्राक्षशेती आणि नोकरीतील पैशांमधून डोंगर उतारावरील शेती सपाट करण्यास सुरुवात केली. आपल्याला शिक्षण पूर्ण करता आलं नाही.

पण मुलांनी चांगलं शिकावं अशी अर्जुन यांची मनापासून इच्छा होती. त्यातून अमित यांनी बीएडीएडपर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षकाची नोकरी मिळवण्याचे त्यांनी प्रयत्न केले.

पण त्यात अपेक्षित यश मिळाले नाही. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली घरच्या शेतीतच रमायचे असे ठरविले. सन २०१४ पासून द्राक्षशेतीची सूत्रे आपल्या हाती घेतली.

परिसरातील अनुभवी व अभ्यासू शेतकऱ्यांसोबत गट तयार केला. पंकज पिसे, सुशीलकुमार पाटील, अरविंद पाटील, संपतराव जाधव, रमेश जाधव असा हा हा मित्रपरिवार आहे.

वर्षभर ते शिवारफेरी करतात. चर्चा होते. बारकावे कळतात. त्यातून नव्या गोष्टी अनुभवण्यास मिळतात. बागेतील निरीक्षणे महत्त्वाची ठरतात.

Exportable Grape production
Grape Export : कमी साखरेच्या द्राक्ष माल निर्यातीचा मुद्दा पुन्हा समोर

गुणवत्तेमुळे चांगला दर

एकरी १२ ते १३ टन उत्पादन मिळते. सुमारे ८० ते ९० टक्क्यांपर्यंत माल निर्यातक्षम दर्जाचा होईल असाच प्रयत्न असतो. एका निर्यातदार कंपनीला दरवर्षी मालाचा पुरवठा होतो.

त्या माध्यमातून युरोपीय देशांना माल निर्यात होतो. गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही हेच तत्त्व कायम ठेवले.

त्यामुळे सातत्याने अपेक्षित दर मिळवणे शक्य झाले आहे. गेल्या दोन वर्षांत प्रति किलो ७८ ते ८२ रुपये, तर त्यामागील दोन वर्षांत ७० ते ७२ रुपये दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामात ९० ते ९५ रुपये दर अपेक्षित आहे. एकरी चार लाख रुपये उत्पादन खर्च येतो.

अमित यांचे द्राक्ष व्यवस्थापन

एकूण शेती- दहा एकर

१) पैकी द्राक्षे- तीन एकर, वाण- थॉम्पसन, २ ए क्लोन

२) लागवड पद्धत- ८ बाय ४ व ७ बाय साडेचार फूट.

३) खरड छाटणीपासून वेलीमध्ये दर्जेदार गर्भधारणा होण्यासाठी काटेकोर नियोजन.

४) उन्हाळ्यात तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि वेलीच्या वाढीचा टप्पा यानुसार पाणी व्यवस्थापन.

५) यामुळे पाने दर्जेदार होतात. वेलीत अन्नसाठा तयार होतो. घड जिरणे, वेलीचा जोम कमी होणे या गोष्टी टाळल्या जातात.

६) पान, देठ सातत्याने केल्याने खतांचा अतिरिक्त वापर टाळला जातो. यामुळे जमिनीचे आरोग्य टिकते.

७) फुलोरा, गोडी छाटणीनंतर ७० व्या, ९० व्या व १०० ते १०५ दिवसांनी असे चार पट्ट्यांत देठ परीक्षण.

८) कमजोर काडी आणि वेळेत वांझ फूट काढली जाते.

९) प्रति वेलीस पानांची संख्या ८०० ते ८५० इतकी ठेवल्याने प्रकाश संश्‍लेषण चांगले होते.

१०) राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या ॲनेक्शर पाचनुसार कीडनाशकांचे नियोजन.

११) प्रति दीड चौरस फुटाला ५०० ग्रॅम वजनाचे दोन घड.

१२) एका वेलीस २४ घड ठेवले जातात. त्यामुळे मण्यांचा आकार आणि दर्जा वाढतो.

Exportable Grape production
Grape Advisory : ढगाळ वातावरणात द्राक्ष बागेची कशी काळजी घ्याल ?

१३) घडाला सुमारे ८० ते ९० मण्यांची संख्या.

१४) द्राक्षातील ब्रिक्सचे प्रमाण- सुमारे १८.

१५) द्राक्षाची जाडी- २२ ते २३ एमएमपर्यंत.

१६) रंग एकसमान.

१७) वर्षभर बागेत केलेल्या कामांच्या नोंदी डायरीत ठेवल्या जातात. पानांची, घडांची संख्या, मण्यांचा आकार यांची निरीक्षणे नोंदविल्याने कोठे सुधारण्याची गरज आहे ते लक्षात आले.

अमित गुरव, ९०११८९६७६७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com