Soybean Maize Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : मका, सोयाबीनची वाढती आवक

Maize Soybean Market : कापूस, मका, मूग व सोयाबीन यांची आवक गेल्या सप्ताहात दिवाळीमुळे घसरली होती. आता ती पुन्हा वाढत्या प्रमाणात सुरू आहे.

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह ९ ते १५ नोव्हेंबर २०२४

कापूस, मका, मूग व सोयाबीन यांची आवक गेल्या सप्ताहात दिवाळीमुळे घसरली होती. आता ती पुन्हा वाढत्या प्रमाणात सुरू आहे. मका व सोयाबीन यांची साप्ताहिक आवक गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अधिक झाली आहे. सोयाबीनच्या किमती अजूनही हमीभावापेक्षा कमी आहेत. जागतिक किमती नजीकच्या भविष्यात वाढण्याची शक्यता फार कमी आहे. भारतातील उत्पादनसुद्धा या वर्षी वाढलेले आहे. आता शासनातर्फे हमीभावाने खरेदी करण्याचे प्रमाण वाढण्याची जरुरी आहे.

१५ नोव्हेंबर २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात रु. ५५,१६० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा घसरून रु. ५४,७८० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स भाव १.८ टक्क्याने घसरून रु. ५५,८९० वर आले आहेत. मार्च भाव रु. ५९,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ७.७ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाची आवक वाढती आहे.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात रु. १,४६७ वर आले आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स रु. १,४९८ वर आले आहेत तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,५५५ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ६ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.

मका

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात रु. २.९ टक्क्यांनी वाढून रु. २,४४५ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. २,४६३ वर आल्या आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स रु. २,४९२ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.९ टक्क्याने अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात रु. १३,६५० वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती ३ टक्क्यांनी वाढून रु. १३,५३८ वर आल्या आहेत. एप्रिल किमती रु. १४,३७४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ५.३ टक्क्यांनी अधिक आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) या सप्ताहात १.१ टक्क्याने घसरून रु. ६,८७५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७,७५० वर स्थिर आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ जाहीर झाला आहे. किमती कमी होत आहेत.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) २.३ टक्क्यांनी घसरून रु. ४,३४३ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) २.४ टक्क्यांनी वाढून रु. ९,८८८ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. नवीन पिकाची आवक जानेवारी अखेर सुरू होईल.

कांदा

कांद्याची किंमत (पिंपळगाव) या सप्ताहात ३.५ टक्क्यांनी वाढून रु. ५,६०० वर आली आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) घसरून रु. २,००० वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर स्थिर आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Cultivation : कळंबा गटाअंतर्गत फळबाग लागवड सुरू

Voter Registration : नव्या २३,४७५ मतदारांची अहिल्यानगर जिल्ह्यात नोंद

Mango Cashew Damage : आंबा, काजू लागवडीची गवा-रेड्यांकडून नासधूस

Maharashtra Election 2024 : मतदारांतील ‘सुप्त’लाटेची उमेदवारांना धास्ती

Fertilizer Shortage : जळगावात खतांची लिंकिंग, टंचाई; खतबाजारात शेतकऱ्यांची लूट

SCROLL FOR NEXT