Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

CCI Cotton Procurement : जाचक अटींमुळे ‘सीसाआय’च्या केंद्रात कापूस विक्रीकडे पाठ

Cotton Market : राज्यात केवळ पावणेपाच लाख क्विंटल कापसाची खरेदी ‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रांत झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : कापूस उत्पादकांच्या उत्कर्षासाठी केंद्राने उभारलेल्या भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) जाचक अटी, वेळखाऊ प्रकार व केंद्रचालकांना मारक असलेली धोरणे यामुळे कापूस विक्रीसंबंधी शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. राज्यात केवळ पावणेपाच लाख क्विंटल कापसाची खरेदी ‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रांत झाली आहे.

‘सीसीआय’ने मराठवाडा विभागात म्हणजेच मराठवाडा व खानदेशात मिळून ४५ कापूस खरेदी केंद्र डिसेंबरमध्ये सुरू केली. तर ३५ केंद्र विदर्भ विभागात सुरू केली. खरेदी केंद्र सुरू होवून अनेक दिवस झाले, पण फक्त पावणेपाच लाख क्विंटल कापसाची म्हणजेच सुमारे ८० हजार कापूस गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) कापसाची खरेदी ७०२० रुपये प्रतिक्विंटल या दरात सीसीआयने केली आहे.

बाजारात कापूसदर हमीभावापेक्षा कमी आहेत. परंतु जाचक अटी, किचकटपणा यामुळे शेतकरी खरेदी केंद्रांत कापसाची विक्री करू शकत नाहीत. अटी, धोरणांत लवचीकता सीसीआय आणत नसल्याने पुढे खासगी खरेदीदार, व्यापाऱ्यांच्या घशात कवडीमोल दरात आपला कापूस शेतकऱ्यांना घालावा लागत आहे.

सीसीआयने कापूस खरेदीसंबंधी ईआरपी (इन्टरप्रोईज रिसोर्स प्लॅनींग) सॉफ्टवेअर तयार करून घेतले आहे. त्यात प्रथम सातबारा किंवा गट क्रमांक, पीकपेरा, आधार व मोबाइल क्रमांक नोंदणी करावी लागते. यानंतरच खरेदी केली जाते. कापूस विक्रेत्याचे बँक खाते आधारला लिंक हवे आहे.

मोबाइलला ओटीपी आल्यानंतर नोंदणी होते. एका शेतकऱ्याच्या नावावर फक्त ४० क्विंटल कापसाची एका दिवसात खरेदी केली जाते. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कापूस पिकाची नोंद विविध कारणांनी लावलेली नाही. कापूस पीकपेरा नोंद नसल्यास कापसाची खरेदी सीसीआय करीत नाही, संबंधित शेतकऱ्यांना खरेदी केंद्रातून परत पाठविले जाते.

सभापतींचे पत्र दुर्लक्षित

अनेक शेतकरी तांत्रिक व इतर कारणांमुळे आपल्या सातबारा उताऱ्यावर २०२३-२४ च्या खरिपात कापूस पिकाची नोंद करू शकलेले नाहीत. संबंधित शेतकऱ्यांची कापूस पीकपेरा नोंद नसल्याने तलाठी यांचे पीकपेरा पत्र, शिफारस घेऊन त्यांच्या कापसाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या सभापतींनी सीसीआयकडे केली आहे. परंतु ही मागणी सीसीआयने दुर्लक्षित केली आहे.

केंद्रचालकांना नुकसानीची भीती

सीसीआय कापूस खरेदीसाठी विविध जिनींग प्रेसिंग कारखान्यांची निवड करते. हे कारखाने खासगी व्यवस्थापनाचे असतात. त्यांच्याशी खरेदी, प्रक्रिया, पॅकिंग याबाबत करार केले जातात. त्यात एक क्विंटल कापसात ३४ किलो उतारा किंवा रूईची निर्मिती व्हायला हवी. यापेक्षा कमी उतारा आल्यास पुढे होणाऱ्या नुकसानीस केंद्रचालक जबाबदार राहतील, असाही निकष आहे. अनेकदा कमी पाऊस, अतिपाऊस व इतर समस्यांमुळे रुईचा उतारा हवा तेवढा मिळत नाही. या अटीमुळे खानदेशात अनेक कारखानदारांनी सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू करण्यासंबंधी नकार दिला आहे, अशी माहिती मिळाली.

सीसीआयचे कापसाचा दर्जा व इतर बाबींचे निकष वरिष्ठांनी तयार केले आहेत. ज्यांच्या सातबारा उताऱ्यावर कापसाचा पीकपेरा नाही, त्या शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी करताना तलाठ्याचे पीकपेरा पत्र ग्राह्य धरण्याची मागणी काही बाजार समित्यांच्या सभापतींनी केली आहे. परंतु ही मागणी शासन किंवा कृषिमंत्रालय, राज्याचे कृषी सचिव, मंत्री आदींनी सीसीआयच्या मुख्यालयात केल्यास त्यावर पुढे निर्णय होवू शकतो.
- पी. अमरनाथ रेड्डी, व्यवस्थापक, सीसीआय, छत्रपती संभाजीनगर विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT