Banana Market
Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : खानदेशात केळी दरात नरमाई

Team Agrowon

Banana Market Khandesh जळगाव ः खानदेशात केळी दरात (Banana Rate) मागील दोन दिवसांत काहीशी नरमाई दिसत आहे. दर २५०० रुपये प्रतिक्विंटलवरून २३५० रुपये प्रतिक्विंटल व किमान १९०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

स्थानिक बाजारातील केळीचे दर २५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक होते. तसेच निर्यातीच्या केळीला मध्यंतरी ३२५० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. आता निर्यातीच्या केळीचे दरही २८०० ते २९०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

केळीची परदेशात पाठवणूक वेगात सुरू आहे. पण स्थानिक बाजारात मागणी कमी झाली आहे. तसेच मध्य प्रदेश प्रदेश व गुजरातमधून केळीचा पुरवठा सुरू झाला आहे. परिणामी उत्तर भारतातील केळीची आवक वाढली आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात केळीला प्रतिक्विंटल २२०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. तेथे केळीची आवक मागील काही दिवसात वाढली असून, ती ८५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी झाली आहे. खानदेशातही स्थानिक बाजारात केळीची आवक ९० ट्रक प्रतिदिन अशी झाली आहे.

सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागात केळीची आवक सुरू आहे. तसेच केळीची परदेशातील निर्यातही रोज वाढत आहे. शनिवारी (ता. ८) व रविवारी (ता. ९) ही पाठवणूक १५ कंटेनर एवढी (एक कंटेनर २० टन क्षमता) होती.

परदेशात केळीची मागणी व पाठवणूक वेगात सुरू असल्याने स्थानिक बाजारातील दरात मोठी घसरण झालेली नाही. इतर राज्यांतूनही केळीचा पुरवठा सुरू झाल्याने स्थानिक बाजार किंवा उत्तर भारत, दिल्ली, पंजाब, काश्मिरात खानदेशातील केळीची मागणी कमी होत आहे, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT