Red Chilli Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Red Chilli Rate: लाल मिरचीच्या दरात ३५ टक्क्यांपर्यंत घट; खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Red Chillli Market : देशातील लाल मिरचीचे भाव मागील वर्षभरात कमी होत गेले. सध्या मिरचीला १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे.

अनिल जाधव

Pune News : देशातील लाल मिरचीचे भाव मागील वर्षभरात कमी होत गेले. सध्या मिरचीला १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. जानेवारी २०२४ मधील दराच्या तुलनेत सध्या ३५ टक्के कमी भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. सरकारने मिरचीची २० हजार रुपये क्विंटलने खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

देशातील बाजारात मिरचीच्या भावात मागील वर्षात चांगली तेजी होती. २०२३ मध्ये मिरचीचा भाव २५ हजारांपर्यंत पोचला होता. त्यानंतर भाव कमी होत गेले. जानेवारी २०२४ मध्ये मिरचीचा भाव १९ हजारांवर पोचला होता.

बहुतांशी बाजारात मिरची १८ हजार ते २० हजाराने विकली जात होती. पण त्यानंतरही मिरचीचे भाव कमी होत गेले. सध्या देशातील बहुतांशी बाजारात मिरची १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. मिरचीचे भाव पडल्याने शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत.

जागतिक पातळीवर ५५ ते ६० लाख टनांच्या दरम्यान मिरची उत्पादन होत असते. जगात सर्वाधिक उत्पादन भारतात होते. भारत जवळपास निम्मे उत्पादन घेतो. देशात मागील हंगामात २८ लाख टन मिरची उत्पादन झाले होते.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मागील काही वर्षात भाव मिळत नसल्याने या दोन्ही राज्यातील मिरची लागवड कमी होत आहे. तरीही शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

देशातून होणारी लाल मिरचीची निर्यातही कमी झाली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये ३६ हजार टनांची निर्यात झाली होती. आधीच्या महिन्यातील निर्यातीच्या तुलनेत ही निर्यात ४ टक्क्यांनी कमी होती. तर एप्रिल ते ऑक्टोबर या काळात देशातून ३ लाख ३१ हजार टनांची निर्यात झाली. तर मागील हंगामात याच काळातील निर्यात ३ लाख टन होती.

म्हणजेच लाल मिरचीची निर्यात वाढली होती. मात्र निर्यातीचे मूल्य कमी झाले. मागच्या वर्षी निर्यात कमी असूनही त्यातून ७ हजार ५७४ कोटी डाॅलर मिळाले होते. मात्र यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्या ७ महिन्यांमध्ये निर्यातीचे मूल्य १५ टक्क्यांनी कमी होऊन ६ हजार ४५१ कोटी डाॅलरपर्यंत कमी झाले होते. म्हणजेच भाव कमी झाल्याने निर्यात वाढूनही निर्यातमूल्य कमीच राहीले.

मदतीची गरज

बाजारात लाल मिरचीचे भाव कमी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. भाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी मिरची शीतगृहात साठवण्याला प्राधान्य दिले. मिरचीचे भाव वर्षभराआधीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी कमी झाले.

तर २०२३ मधील उच्चांकी भावाच्या तुलनेत निम्म्याने कमी झाले आहेत. या भावात मिरची विकल्यानंतर तोटा होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी मिरची विकताना दिसत नाहीत. भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांनी प्रतिक्विंटल २० हजाराने मिरची खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT