Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : बेदाणा दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ

Bedana Rate : येत्या महिन्यात श्रावण आणि गोकूळ अष्टमी सणानिमित्त बाजारपेठेत बेदाण्याच्या खरेदीसाठी व्यापारी नियोजन करू लागले आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : ः येत्या महिन्यात श्रावण आणि गोकूळ अष्टमी सणानिमित्त बाजारपेठेत बेदाण्याच्या खरेदीसाठी व्यापारी नियोजन करू लागले आहेत. यामुळे गेल्या आठवड्यापासून बेदाण्याच्या दरात प्रति किलोस १० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या बेदाण्याला प्रतिकिलोस १२० ते २४० रुपये असा दर मिळत आहे. सणानिमित्त मागणी वाढू लागल्याने दरातही वाढ होईल, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला.

राज्यात बेदाण्याचे २ लाख २० हजार टन इतके उत्पादन झाले आहे. फेब्रुवारीपासून जुलै अखेरपर्यंत सुमारे १ लाख १६ हजार टन बेदाण्याची विक्री झाली असल्याचा अंदाज तासगाव बाजार समितीने व्यक्त केला आहे. सध्या सांगली, तासगाव, पंढरपूर या बेदाण्याच्या बाजारपेठेतील शीतगृहात १ लाख ४ हजार टन बेदाणा शिल्लक आहे. त्यामुळे नवीन बेदाण्याचा हंगाम सुरू होईपर्यंत बेदाणा पुरवठा येईल.

तासगाव, सांगली आणि पंढरपूर या बाजारपेठेत सौद्याला एक हजार टन आवक होत असून ५० टक्के बेदाण्याची विक्री होत आहे. गत आठवड्यात बेदाण्याला प्रतिकिलोस ११० ते १५५ रुपये दर होता. यामध्ये दर्जेदार बेदाण्याला प्रतिकिलोस २३० रुपये दर मिळत होता. सणानिमित्त बेदाण्याची मागणी किंचित वाढली असल्याने बेदाण्याच्या दरात प्रति किलोस १० रुपयांनी वाढ झाली आहे.

बेदाण्याचा बाजारपेठेत दर्जेदार बेदाण्याची आवक फार कमी असते. त्यामुळे स्पर्धेतून दर्जेदार बेदाण्याला चांगले दर मिळतात. त्यानुसार शेतकरी बेदाण्याची प्रतवारी करुन विक्रीसाठी ठेवला जातो. सध्या तासगाव, सांगली आणि पंढरपूर या तीन बाजारपेठेत सौद्याला अंदाजे ११ टन बेदाण्याची आवक होते. या दर्जेदार बेदाण्याच्याही दरात प्रति किलोस १० रुपयांनी वाढ झाली आहे.

अंदाजे बेदाणा विक्री दृष्टिक्षेप (टनात)

महिना...टन

फेब्रुवारी...२० हजार

मार्च...३७ हजार

एप्रिल...२५ हजार

मे...१३ हजार

जून...१० हजार

जुलै...११ हजार

एकूण..१ लाख १६ हजार

(स्त्रोत ः तासगाव बाजार समिती)

बेदाण्याची मागणी स्थिर असून उठावही चांगला होत आहे. श्रावण आणि गोकूळ अष्टमी सणानिमित्त बेदाण्याची मागणी वाढत आहे. यामुळे बेदाण्याच्या दरात प्रति किलोस दहा रुपयांनी वाढ झाली आहे. येत्या काळात बेदाण्याचे दर वाढतील, अशी आशा आहे.

- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Winter Livestock Care: थंडीमध्ये जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

Farmer Demand: शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपये मदत करा; संभाजी ब्रिगेड

Crop Loss Inspection: अतिवृष्टी, महापुराची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Farmers Protest: सातबारा कोरा करण्याची घोषणा फसवी

KGS Sugar Mill: केजीएस साखर कारखान्याचे धुराडे पेटणार

SCROLL FOR NEXT