Raisin Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Rate : बेदाणा दरात प्रति किलो २० रुपयांनी घट

यंदाच्या बेदाणा हंगामाला गती आली असून, शेडवर बेदाणा निर्मितीची धांदल सुरू झाली आहे. कवठे महांकाळ तालुक्यातील नागज परिसरासह अन्य भांगातील सुमारे तीन ते चार हजार शेडवर बेदाणानिर्मिती सुरू झाली आहे.

अभिजीत डाके

Raisin Market Update सांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामाला (Raisin Season) गती आली असून, शेडवर बेदाणा निर्मितीची (Raisin Production) धांदल सुरू झाली आहे. कवठे महांकाळ तालुक्यातील नागज परिसरासह अन्य भांगातील सुमारे तीन ते चार हजार शेडवर बेदाणानिर्मिती सुरू झाली आहे.

पोषक वातावरणामुळे दर्जेदार बेदाणा तयार होत आहे. आवक (Raisin Arrival) वाढली असून होळी सणानिमित्त बेदाण्याची खरेदी (Raisin Procurement) अंतिम टप्प्यात आली आहे.

मात्र एका आठवड्यात बेदाण्याच्या दरात (Raisin Rate) २० रुपयांनी घट झाली असून, गोड बेदाणा कडू झाल्याने उत्पादक ऐन हंगामात अडचणीत आले आहेत.

राज्यातील सांगली, सोलापूर जिल्ह्यांत बेदाण्याचे सर्वाधिक उत्पादन असून, नाशिक जिल्ह्यातही बेदाणा तयार होत आहे. वास्तविक, सांगली जिल्ह्यातील अनेक बेदाणा उत्पादक कर्नाटक सीमेवर जाऊन बेदाणा तयार करतात.

या वर्षी कर्नाटक सीमेवर असलेल्या विजापूर अथणी या भागात लवकर बेदाणानिर्मिती सुरू झाली असून, या भागातील बेदाणा सर्वांत अगोदर विक्रीस आला. राज्यात गेल्या वर्षी १ लाख ८० टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते.

दोन वर्षांपूर्वी १ लाख ७० हजार टन इतके बेदाण्याचे उत्पादन झाले होते. अर्थात, १० हजार टनांनी बेदाण्याचे उत्पादन वाढले होते. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी राज्यात सुमारे १० ते १२ हजार टन बेदाणा शिल्लक होता.

वास्तविक, यंदा बेदाण्याचा हंगाम एक महिना उशिराने सुरू झाला. सुरुवातीच्या टप्प्यात हंगामाला फारशी गती नव्हती. परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बेदाणा हंगामाला गती आली असल्याचे चित्र आहे.

सांगली जिल्ह्यात सुमारे ३ ते ४ हजार शेडवर बेदाणानिर्मिती सुरू आहे. नवीन बेदाणा विक्रीस आल्यानंतर प्रति किलोस १३० रुपयांपासून ते २५० रुपये दर होते.

गेल्या आठवड्यापासून आवकेत वाढ होऊ लागली आहे. सध्या सांगली, तासगाव बाजार समितीत सुमारे १० हजार टन बेदाण्याची आवक होत आहे.

बेदाणानिर्मितीकडे वाढला कल

हंगामाच्या प्रारंभी द्राक्षाला चांगले दर मिळाले. यंदा द्राक्षाला पोषक असे वातावरण नाही. परंतु त्यामुळे द्राक्षात गोडी उतरण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, अपेक्षित दर मिळत नाही.

द्राक्ष विक्री करून आर्थिक फटका बसण्यापेक्षा बेदाणा तयार केला तर दोन पैसे मिळतील या आशेमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी थेट बेदाणानिर्मितीकडे वळाले आहेत. त्यामुळे शेडवर बेदाणानिर्मितीसाठी लगबग सुरू झाली आहे.

उत्पादन वाढण्याची शक्यता

यंदाच्या हंगामात बेदाणा निर्मितीस पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे दर्जेदार बेदाणा होत आहे. बेदाणा रॅकवर टाकल्यानंतर सुमारे १२ ते १४ दिवसांत तयार होत आहे.

त्यामुळे यंदाच्या हंगामात १० ते १५ हजार टनांनी बेदाण्याचे उत्पादन वाढेल, असा प्राथमिक अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला.

प्रतवारीनुसार बेदाण्याचे दर (प्रति किलो)

हिरवा ः १२५ ते २००

पिवळा ः १५० ते २००

काळा ः ३० ते ५०

बाजारात बेदाण्याची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे दर कमी झाले असून बेदाणा शीतगृहात ठेवण्याशिवाय पर्याय नाही.

- संजय पाटील, बेदाणा उत्पादक शेतकरी, हिंगणगाव, ता. कवठे महांकाळ

बेदाणा हंगामाला गती आली आहे. यंदा बेदाण्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यातच द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणानिर्मितीकडे वळाला आहे.

- सुनील माळी, बेदाणा शेड मालक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT