Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market Solapur : बेदाण्याची आवक घटली तरीही दर कमीच

Raisin Rate : गत महिन्याच्या तुलनेने प्रतिकिलो १०० रुपयांनी दर घसरले आहेत. यावर्षी बेदाण्याच्या हंगामाच्या सुरुवातीला सर्वोच्च असा दर मिळाला होता.

Team Agrowon

Solapur News : बेदाण्याच्या दरामध्ये घट झाली आहे. आवक घटल्यानंतरही दरात घसरण झाली आहे. गत महिन्याच्या तुलनेने प्रतिकिलो १०० रुपयांनी दर घसरले आहेत. यावर्षी बेदाण्याच्या हंगामाच्या सुरुवातीला सर्वोच्च असा दर मिळाला होता. मात्र सध्या बाजारात मिळत असलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.

चालू वर्ष द्राक्ष उत्पादकांसाठी समाधानकारक असल्याचे बोलले जात होते. मात्र द्राक्ष उत्पादकांचा आनंद हा अल्पकाळ ठरला आहे. गुरुवारी (ता. ८) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावामध्ये बेदाण्याला कमाल चारशे रुपये तर किमान दीडशे रुपये प्रतिकिलो इतका भाव व सरासरी भाव प्रतिकिलो अडीचशे रुपयांपर्यंतच मिळाला.

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला पाचशे रुपये प्रतिकिलो दराने बेदाणा विक्री होत होता. मात्र चालू महिन्यात या दरामध्ये प्रतिकिलो १०० रुपयांची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात बेदाण्याची बाजारातील आवक कमी झाली आहे.

असे असतानाही दर पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बेदाणा व्यापारातील जाणकारांच्या माहितीनुसार सध्या बेदाणा व्यापाऱ्यांची खरेदी संपत आली आहे यामुळे मागणी कमी झाले आहे, याचा परिणाम दरावर झाला आहे.

बिराजदारांच्या बेदाण्याला ४०० रुपयांचा भाव

दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरपनहळळी येथील शेतकरी राहुल रामचंद्र बिराजदार या शेतकऱ्याच्या ८१ बॉक्स बेदाण्याला प्रतिकिलो ४०० रुपयांचा भाव मिळाला. समितीतील आडती बसवराज अंबारे यांच्यामार्फत हा बेदाणा विक्री झाला. तासगाव येथील नंदीकृष्ण या व्यावसायिकांनी हा बेदाणा खरेदी केला.

सोलापूर बाजार समितीतील सौद्याची स्थिती

एकूण आवक - २७५ टन

विक्री झालेला बेदाणा - १६४ टन

विक्री न झालेला - १११ टन

कमाल दर - ४०० किलो

किमान दर - १३५ प्रति

सरासरी दर - २७० प्रति

एकूण उलाढाल - ४ कोटी ४४ लाख ६० हजार ९००

आगामी गणेश उत्सव, गौरी, दिवाळी या सणांमध्ये बेदाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे या कालावधीत बेदाण्याच्या दरात सुधारणा होईल. सध्या व्यापाऱ्यांनी खरेदीचा कल कमी केला आहे. यामुळे दर घसरले आहेत.
- राजेंद्र पवार, शीतगृहचालक, पंढरपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season : कर्नाटकचा ‘गनिमी कावा’

Soybean Procurement : हमीभावात सोयाबीन खरेदीचा मुहूर्त दिवाळीनंतरच

Sugar Market : दिवाळीमुळे देशाअंतर्गत साखर बाजारातील तेजी स्थिर

MPKV Rahuri :" महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलगुरू निवड प्रक्रियेवर ‘बोट’

Sugarcane Season : ऊसदरासह शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

SCROLL FOR NEXT