Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : बाजारभावाने तूर खरेदी; सरकारचा नवा अजेंडा की शेतकऱ्यांचा कळवळा? 

Anil Jadhao 

Pune News : केंद्र सरकार यंदा शेतकऱ्यांकडून हमीभावाने नाही तर बाजारभावाने तूर खरेदी करणार आहे. सरकार ८ ते १० लाख टन तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण अधिकृत आकडा सरकारने जाहीर केला नाही.

तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळात तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकार खेरदी केलेली तूर बाजारात आणू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.


पण महत्वाचा प्रश्न हा आहे की सरकार बाजारभावाने तूर खरेदी का करतंय? दुष्काळामुळे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी? असं असतं सरकारने कापूस, सोयाबीन, मका, कांदा, टोमॅटोचीही अशी खरेदी करायला पाहीजे.

मग तुरीचीच का? कारण आहे निवडणुका आणि तुरीचे भाव. सरकारने लोकसभेची समेफायनल म्हणजेच तीन राज्यांच्या निवडणुका जिंकल्या. आता फायनल तोंडावर आली. म्हणजेच लोकसभेच्या निवडणुका.

सरकार निवडणुकांमुळे सगळ्या शेतीमालाचे भाव पाडत आहे. आपला कांदा, टोमॅटो, गहू, तांदूळ, सोयाबीन सर्वांचे भाव कमी केले. पण तुरीचे भाव कमी झाले नाही. कारण देशातील कमी उत्पादन आणि आयातीवरील मर्यादा. हरभऱ्याप्रमाणे जर तुरीचा स्टाॅक असता तर तो कमी भावात बाजारात आणून भाव पाडता आले असते.

पण तसं करता आले नाही. हेच करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. सरकार खेरदी केलेली तूर खुल्या बाजारात तर विकेलच पण गरिबांना रेशनवरही स्वस्त तूर डाळ देऊ शकतं. सरकारला तुरीचे भाव वर्षभर कमी ठेवयाचे असेही, फक्त आपली निवडणूक झाली की झालं, हे सरकारचं धोरण दिसतं, असे जाणकार सांगतात.

पण सरकारने तूर खेरदीबाबत काय निर्णय घेतला आणि सरकार किती तूर खेरदी करणार आहे? याची माहिती घेऊ. सरकारने यंदा हमीभावाने नाही तर बाजार भावाने तूर खरेदीचा निर्णय घेतला. म्हणजेच यंदा नाफेडला किंवा एनसीसीएफला तूर विकला तर हमीभाव असलेला ६ हजार ६०० रुपये भाव मिळणार नाही.

तर तुम्ही ज्यावेळी तूर विकणार आहोत, त्यावेळी असलेला बाजारभाव मिळेल. नाफेड आपला खरेदीचा भाव जाहीर करेल. उदा. तुम्ही २० फेब्रुवारीला तूर विकणार आहात. आणि नाफेडने ८ हजार भाव जाहीर केला. तर तुम्हाला हमीभाव ६ हजार ६०० रुपये आणि तर ८ हजारांचा भाव मिळेल.

केंद्र सरकार किती तूर खरेदी करणार याचा निश्चित आकडा स्पष्ट केलेला नाही. पण सरकारला जर तूर बाजारात हस्तक्षेप करून हरभऱ्याप्रमाणे भाव स्थिर ठेवायचे असतील तर १० लाख टनांच्या दरम्यान खरेदी करावी लागेल. केंद्रीय सहकार विभागाने यापुर्वी ८ ते १० लाख टन खेरदीचे उद्दीष्ट असल्याचे सांगितले होते. म्हणजेच सरकार एवढी तूर खरेदी करेल, असा अंदाज आहे.

आता सरकार बाजारभावाने तूर खरेदी करणार म्हटल्यावर बाजार कसा राहू शकतो? तर बाजार मुख्यतः शेतकरी तूर कधी आणि कशी विकतात त्यावर अवलंबून राहील. यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे पुढील काळात तुरीचे भाव मागचे सहा महिने राहिले त्याप्रमाणे वाढू शकतात. पण ऐन आवकेच्या हंगामात, म्हणजेच मार्चपर्यंत बाजारात तुरीची आवक कशी राहते?

याचाच भावावर चांगलाच परिणाम दिसेल. तसेच सरकार जी तूर खरेदी करणार आहे, ती तूर लगेच निवडणुकांच्या आधी भाव कमी करण्यासाठी बाजारात आणू शकते. म्हणजेच जास्तीत जास्त पुरवठा या काळात होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर विक्री करताना ही गोष्ट लक्षात ठेवावी. तसेच शक्य असल्यास बाजारावर आवकेचा दबाव येणार नाही, अशी विक्री करावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT