Chana Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana MSP : हमीभावाने हरभरा खरेदीसाठी उत्पादकतेची मर्यादा वाढविण्याची मागणी

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासकीय केंद्रावर शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदीची मर्यादा प्रतिहेक्टरी ८ क्विंटल एवढी निश्‍चित करण्यात आली आहे.

Team Agrowon

Chama Market परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी (MSP Procurement) योजनेअंतर्गत हमीभावाने हरभरा खरेदीसाठी (Chana Procurement) प्रतिहेक्टरी उत्पादकतेची मर्यादा वाढवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांच्याकडे करण्यात आली आहे.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासकीय केंद्रावर शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदीची मर्यादा प्रतिहेक्टरी ८ क्विंटल एवढी निश्‍चित करण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यातील हरभऱ्याच्या उत्पादकतेत वाढ झाल्याचे पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षांवरून आढळून येत आहेत.

त्यामुळे यापूर्वी निश्‍चित करण्यात आलेली प्रतिहेक्टरी ८ क्विंटलची उत्पादकता शेतकऱ्यांवर अन्यायकारक तसेच चुकीची आहे. हमीभावाने हरभरा खरेदीसाठी प्रतिहेक्टरी १५ ते २० क्विंटल एवढी उत्पादकता मर्यादा करण्यात यावी.

अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, मुंजाभाऊ लोडे, प्रसाद गरुड, भगवान शिंदे, माउली लोडे, अंकुश शिंदे, हनुमान भोसले, मोकिंदा वावरे, बाळासाहेब घाटोळ, रामभाऊ आवकरगंड, डिंगाबर पवार, उद्धव जवंजाळ, मोकिंदा शिंदे, गजानन तुरे, सोपान आवचार यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ यांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून दोषमुक्त

Census 2027 : जनगणनेची प्रश्नावली जारी; ३३ प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरे

Water Scarcity: देशातील मोठ्या जलाशयांतील पाणीसाठा घसरला; सध्या केवळ ७१ टक्के पाणी उपलब्ध

EVM Controversy: ‘ईव्हीएम हटवा’साठी तांदूळवाडीत बेमुदत उपोषण

Cotton Rate: शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यावर दरात सुधारणा

SCROLL FOR NEXT