Commodity Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : मका वगळता सर्व पिकांच्या किमतींत घसरण

Team Agrowon

फ्यूचर्स किमती :

सप्ताह : २९ जून ते ५ जुलै, २०२४

चांगल्या पावसामुळे या वर्षी देशात २८ जूनपर्यंत समाधानकारक पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात झालेल्या पेरणीपेक्षा या वर्षी ३३ टक्के अधिक क्षेत्र खरीप पिकांखाली आले आहे. यात तूर, मका, सोयाबीन व कापूस यांचा मोठा वाटा राहिला.

मॉन्सूनच्या उरलेल्या कालावधीत पावसाची स्थिती अशीच समाधानकारक राहिली तर या सर्व पिकांचे उत्पादन या वर्षी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या वर्षीचा साठा लवकर बाजारात येईल व त्यांचा परिणाम नजीकच्या किमतींवर होईल.

सोयाबीनच्या जागतिक परिस्थितीबद्दल बोलायचे तर २०२४-२५ मार्केटिंग वर्षात जागतिक उत्पादन व वर्ष-अखेर साठा मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे किमती सुद्धा घसरत आहेत. अमेरिकेतील सोयाबीनच्या किमतींनी जूनमध्ये २००० नंतरची नीचांकी पातळी गाठली.

सध्या मूग व रब्बी मका यांच्या आवकेचा हंगाम सुरू आहे. या वर्षीची आवक गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक झाली आहे. मक्याची मागणीसुद्धा चांगली आहे. या सर्व कारणांमुळे या सप्ताहात मका वगळता सर्व पिकांच्या किमती घसरल्या. ५ जुलै रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ५८,१६० वर आले होते. या सप्ताहात ते ०.२ टक्क्याने घसरून रु. ५८,०६० वर आले आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स भाव ०.३ टक्क्याने वाढून रु. ५९,५०० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव रु. ५५,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.३ टक्क्यांनी कमी आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात ०.३ टक्क्याने घसरून रु. १,५१० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४४० वर आले आहेत. कापसाचे या वर्षासाठी हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात २.१ टक्क्यांनी वाढून रु. २,४०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.२ टक्क्यांनी वाढून रु. २,५०० वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती ४ टक्क्यांनी वाढून रु. २,५२३ वर आहेत.

ऑक्टोबर फ्यूचर्स रु. २,५५२ वर आहे. ती स्पॉटपेक्षा २.२ टक्क्यांनी अधिक आहे. मक्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही; मात्र हेजिंगसाठी या किमतींवर लक्ष ठेवावे. या वर्षासाठी मक्याचा हमीभाव रु. २,२२५ आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत. मक्याच्या किमतीमध्ये वाढता कल आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १७,७४२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.८ टक्क्यांनी घसरून रु. १७,२४४ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. १५,८५६ वर आल्या आहेत. ऑक्टोबर किमती रु. १६,६२३ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ३.६ टक्क्यांनी कमी आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ६,७५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.७ टक्क्यांनी घसरून रु. ६,५०० वर आल्या आहेत. चालू हंगामासाठी हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,३०० वर आलेली आहे. मुगाचा चालू हंगामासाठी हमीभाव रु. ८,६८२ जाहीर झाला आहे. आवक वाढू लागली आहे.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.३ टक्क्याने घसरून रु. ४,६३३ वर आली आहे. चालू वर्षासाठी सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,७५८ वर आली होती. या सप्ताहात ती १.६ टक्क्याने घसरून रु. १०,५८३ वर आली आहे. तुरीचा चालू वर्षीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. ३,०५० होती; या सप्ताहात ती रु. २,९६७ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ४,००० वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT