Milk Powder
Milk Powder Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Milk Powder Rate : दूध भुकटीची दर वाढ कायम

Raj Chougule

कोल्हापूर : ‘लम्पी स्कीन’सह (Lumpy Skin) अन्य कारणांमुळे यंदा जादा दुधाच्या काळातही दूध संकलनात (Milk Collection) अपेक्षित वाढ झाली नाही. जितके दूध संकलित झाले, तितक्या सर्व दुधाची विक्री सध्या सुरू आहे. भुकटीचे उत्पादन (Milk Powder Production) करण्यासाठी दुधाची उपलब्धता नसल्याने सध्या भुकटीचे उत्पादन कमी प्रमाणात होत आहे. यामुळे दूध भुकटीचे दर (Milk Powder Rate) तेजीत स्थिर आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून दूध भुकटीचा दर सातत्याने ३०० रुपयांच्या वर आहे. सध्या गाईच्या दुधाच्या भुकटीचा दर प्रति किलो ३२०, तर म्हशीच्या दुधाच्या भुकटीस प्रति किलोस ३४५ रुपयांपर्यंत दूध दर आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत दूध भुकटीचे दर २५० रुपयांच्या आसपास होते. यंदा यात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. भविष्यात उन्हाळा असल्याने या काळातील दुधाचे संकलन घटणार असल्याने भुकटीचे दर वाढलेलेच राहतील, असा अंदाज दुग्ध व्यवसायातील व्यापारी सूत्रांचा आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील दूध संघ दूध संकलनासाठी धडपडत आहेत. लम्पी स्कीन आजाराच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी पशुधनाची हानी झाली. देशभरात दुधाच्या संकलनात मोठी घट झाली. याचा मोठा फटका राज्यातील दुग्ध उद्योगालाही बसला. गेल्या सहा महिन्यांपासून अनेक मातब्बर दूध संघ दूध घटीने त्रस्त आहेत. गायीच्या दूध संकलनात घट येत असल्याने बहुतांशी दूध संघाने गेल्या सहा महिन्यांमध्ये दुधाच्या गाय खरीदी दरात चांगलीच वाढ केली.

संकलित झालेले बहुतांशी दूध विक्री होत असल्याने प्रत्येक वर्षी भुकटीसाठी दूध फारसे शिल्लक राहत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक भुकटी तयार करणाऱ्या काही कंपन्यांनीही दूध संघाकडे दुधाची मागणी केली आहे. संघांकडेही भुकटी तयार करण्यासाठी कमी दूध शिल्लक राहत आहे. यामुळे ज्या प्रमाणात भुकटीचे उत्पादन व्हायला हवे त्या प्रमाणात ते होत नसल्याचे चित्र आहे.

दूध पावडरचा वापर प्रामुख्याने आइस्क्रीम व दही बनवताना जास्तीत जास्त केला जातो. आगामी उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही घटकांसाठी दूध भुकटीची मागणी वाढण्याची संकेत आहेत. तर उलट पक्षी जानेवारीनंतर उन्हाळ्यामुळे जूनपर्यंत दुधाच्या संकलनात आणखी घट अपेक्षित आहे. याचा परिणाम दूध भुकटीचे दर वाढण्यावर होऊ शकतो, असा अंदाज व्यापारी सूत्रांचा आहे.

यंदा ऑक्टोबरपासून जेवढ्या प्रमाणात दुधाची वाढ अपेक्षित होती तेवढी दूध वाढ झाली नाही. सध्या दुधाची चणचण भासत नसली तरी जेवढे दूध संकलन होते त्याची विक्रीही तेवढीच होत आहे. पावडरसाठी अतिरिक्त दूध शिल्लक ठेवणे कसरतीचे ठरत आहे. दूध पावडर ज्या प्रमाणात बनायला पाहिजे तेवढी बनत नसल्याने उन्हाळ्यात दुधाच्या भुकटीला मागणी राहील, अशी शक्यता आहे.
महावीर पाटील, व्यवस्थापकीय संचालक, स्वाभिमानी दूध संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT