Sugar Export  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Export : पुढील हंगामावरही साखर निर्यात बंदीचे सावट

Sugar Market Update : यंदा दुसऱ्या टप्प्यातील साखर निर्यातीत केंद्रांने खो घातल्यानंतर आता पुढच्या हंगामाच्या साखर निर्यातीच्या परवानगीवरही अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदा दुसऱ्या टप्प्यातील साखर निर्यातीत केंद्रांने खो घातल्यानंतर आता पुढच्या हंगामाच्या साखर निर्यातीच्या परवानगीवरही अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. यंदा अंदाजापेक्षा कमी साखर उत्पादन झाल्याने पुढच्या वर्षी केंद्र तातडीने निर्यातीस परवानगी देणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

जोपर्यंत साखर उत्पादनात वाढ झाल्याचे केंद्राच्या निदर्शनास येणार नाही, तोपर्यंत निर्यातीचा विचारही केला जाणार नाही, असे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. अशी परिस्थिती राहिल्यास पुढील हंगामावरही निर्यात बंदीचे सावट कायम राहण्याची शक्यता आहे.

सरत्या हंगामात हंगाम सुरू झाल्यानंतर एक महिन्याने केंद्र सरकारने साखर निर्यातीस परवानगी दिली. ६१ लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिल्यानंतर मेमध्ये आणखी निर्यातीस परवानगी देऊ असेच केंद्राने सांगितले होते.

पण उत्पादन घटल्याने केंद्राने निर्यातीस परवानगी देण्यास नकार दिला. अगदी शेवटपर्यंत कारखानदारांनी आग्रहीपणे केंद्राकडे निर्यातीची मागणी केली. पण केंद्राने परवानगी दिली नाही. आता देशातील हंगाम संपला आहे, याचबरोबर निर्यातीस परवानगीची शक्यताही संपली आहे.

पुढील हंगाम सुरू होण्यास आणखी तीन महिन्यांचा कालावधी असला तरी केंद्राने निर्यातीबाबत कोणता निर्णय घेण्यात येईल, याबाबत कोणतीच सूतोवाच केले नाही.

अद्याप साखर उद्योगातील संस्थांनीही पुढील वर्षी साखर हंगामाचे कसे चित्र असेल याबाबतचा अंदाज वर्तवसेला नाही. पुढील हंगामात पाऊस किती पडेल याबाबतही अजून ठोस अंदाज आलेला नाही. यामुळे पुढील अंदाजही वर्तवता येत नसल्याची स्थिती आहे.

केंद्रीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षाचा हंगाम सुरू झाल्यानंतर जसे साखरेचे उत्पादन होईल, हंगामाचे चित्र स्पष्ट होईल, त्याचा विचार करून निर्यातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कदाचित पुढील वर्षीही यंदासारखी स्थिती राहिल्यास निर्यातीस परवानगी मिळू शकणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

Seeds Testing Demonstration: कारंब्यात सोयाबीन, तूर बियाणे उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षिक

Water Crisis: पाणीटंचाईच्या महाडला झळा

DAP Fertilizers Alternative: शेतकऱ्यांनी ‘डीएपी’ खताला पर्यायी खतांचा वापर करावा

SCROLL FOR NEXT