Papaya Rate
Papaya Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Rate : खानदेशात पपई दर स्थिर

Team Agrowon

जळगाव ः खानदेशात पपईचे दर (Papaya Rate) थेट शिवार खरेदीत प्रतिकिलो नऊ ते साडेनऊ रुपयांवर स्थिर आहेत. पपईची आवक (Papaya Arrival) अद्याप स्थिर आहे.

थंडीमुळे पपईस उठाव आहे. सध्या प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) पपईची (Papaya Market) आवक होत आहे.

सर्वाधिक ६० ते ६५ ट्रक पपईची आवक शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यात होत आहे. एकाच वेळी अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांच्या पपई बागांमध्ये ८० टक्के काढणी पूर्ण झाली आहे.

सध्या उशिरा येणाऱ्या व अधिक उत्पादन देणाऱ्या पपई पिकातून उत्पादन किंवा काढणी सुरू आहे. आवक सध्या स्थिर आहे. परंतु उठाव आहे.

दिल्ली, पंजाब, हरियाना येथून अधिक मागणी आहे. पपईचे दर मागील हंगामाच्या तुलनेत यंदा टिकून आहेत. यंदा लागवड स्थिर होती. परंतु उठाव सुरवातीपासून आहे. ऑक्टोबरमध्ये पपईचे दर १८ ते २१ रुपये प्रतिकिलो जागेवरच शेतकऱ्यांना मिळत होते.

नंतर दरात घसरण झाली आहे. फेब्रुवारीत आवकेत मोठी घट होवू शकते. या काळात मागणीदेखील उत्तर भारतातील राज्यांमध्ये राहील. यामुळे दरात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे.

धुळ्यातील शिरपूर व शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर या भागात अधिकची पपई आवक होत आहे. दर्जेदार पपई या भागात येत आहे. राज्यात मुंबई, ठाणे या भागातही पपईची पाठवणूक काही खरेदीदार करीत आहेत.

पपईची आवक या महिन्याच्या सुरुवातीलादेखील प्रतिदिन १५० ट्रक अशीच होती. जानेवारीत आवक अधिक असते. यामुळे दरांबाबत चढउतारही होतो. परंतु यंदा मागणी टिकून राहिल्याने दरही स्थिर राहिले.

नंदुरबार, नवापूर तालुक्यातील काही एजंट गुजरातेत पपईची पाठवणूक करीत आहेत. तसेच शहादा येथून मध्य प्रदेशातील रतलाम, इंदूरच्या बाजारातही पपईची पाठवणूक केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT