Papaya Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Rate : खानदेशात पपईदरात सुधारणा

खानदेशात पपईची आवक स्थिर आहे, पण मागणी वाढली असून, दरात सुधारणा झाली आहे. सध्या प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) पपईची आवक होत आहे.

Team Agrowon

जळगाव ः खानदेशात पपईची आवक (Papaya Arrival) स्थिर आहे, पण मागणी वाढली असून, दरात सुधारणा (Papaya Rate) झाली आहे. सध्या प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) पपईची आवक होत आहे.

पपईचे दर १० दिवसांपूर्वी नऊ ते १० रुपये प्रतिकिलो असे जागेवरच किंवा थेट शिवार खरेदीत शेतकऱ्यांना मिळत होते. परंतु उत्तर भारतात थंडी वाढली आहे. तसेच राज्यासह इतरत्र थंडीचे आगमन झाले आहे. यामुळे मागील काही दिवसांत पपईदरात सुधारणा झाली असून, थेट खरेदीत १२ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे.

पपई काढणी सध्या वेगात सुरू आहे. जानेवारीत खानदेशात पपईची मोठी आवक होते. याच काळात उठावही असतो. पपईची पाठवणूक सध्या दिल्ली, हरयाना, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात केली जात आहे.

पपईदरांवरून मध्यंतरी शेतकरी व खरेदीदार यांच्यात वाद निर्माण झाले होते. त्याबाबत नंदुरबारात शेतकरी व खरेदीदार यांच्यात बैठकही झाली होती. त्यात बैठकीत तोडगा निघाला. पुन्हा दरात घसरण झाली. परंतु मागणी किंवा उठाव वाढल्याने दरात सुधारणा झाली आहे.

पपईची सर्वाधिक आवक नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे होत आहे. तेथे खानदेशातील एकूण आवकेतील ६० टक्के पपईची काढणी होत आहे. यापाठोपाठ धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर या भागांतही पपईची बऱ्यापैकी आवक होत आहे.

पपईला थंडी कायम राहिल्यास उठावही असणार आहे. उत्तर भारतात पपईचे उत्पादन होत नसल्याने तेथून सुरुवातीपासून मागणी आहे. पुढे आवक कमी होईल आणि उठावही राहील. परिणामी पपईदरात सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT