Papaya Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Market Rate : खानदेशात पपई दर आठ रुपये प्रतिकिलो

खानदेशात सध्या पपईस जागेवर आठ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. दरात मागील १५ ते २० दिवसांत काहीशी घसरण झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon Market News : खानदेशात सध्या पपईस (Papaya Rate) जागेवर आठ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. दरात मागील १५ ते २० दिवसांत काहीशी घसरण झाली आहे. मध्यंतरी प्रतिकिलो १२ ते साडेबारा रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळत होता. (Latest Agriculture News)

उत्तर भारतातून मागणी कमी होत आहे. कारण उष्णता वाढत आहे. मार्चमध्ये दर्जेदार किंवा मॉलमध्ये मागणी असलेल्या पपईसाठी शेतकऱ्यांना कमाल १४ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळाला होता. पण उष्णता जशी वाढली, तसे दरही कमी झाले.

दर कमी होत असल्याने व पिकास उष्णतेचा फटका बसल्याने अनेकांनी मागील आठ ते १० दिवसांत पीक काढले आहे. अनेकांचे पीक १३ ते साडेतेरा महिन्यांचे झाले होते.

मागील वर्षी फेबुवारी, मार्चमध्ये लागवड केलेल्या पपई पिकातून ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्येच उत्पादन सुरू झाले होते. तेव्हापासून उत्पादन सतत सुरू होते. परंतु बागेची उत्पादन क्षमता मार्चच्या सुरुवातीलाच अनेक भागांत कमी झाली.

परिणामी मार्चमध्ये आवक कमी झाली. जानेवारी व फेब्रुवारीत खानदेशात प्रतिदिन सरासरी ७५ ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) आवक झाली. मार्चमध्ये मात्र प्रतिदिन सरासरी ४५ ट्रक एवढीच आवक होत होती. यामुळे मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात दरात सुधारणा झाली होती.

जागेवर सरासरी दर १२ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. परंतु मार्चच्या अखेरीस दरात घसरण सुरू झाली. आता उष्णताही वाढली आहे. यामुळे पपईची मागणी स्थानिक भागात व उत्तर भारतातही कमी झाली आहे.

पंजाब, दिल्ली, राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक भागांतील काही मॉलमध्ये मागणी आहे. नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात काढणी सुरू आहे. खानदेशात कमाल क्षेत्रातील पपईचे पीक काढण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Recognition: महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांची माहिती

Pimpalgaon Baswant APMC: पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो खरेदीतील दरतफावतीला लगाम

Rain Deficit : नऊ महसूल मंडलांत २१ दिवसांचा पावसाचा खंड

Agricultural Drought : शेतशिवाराला दुष्काळाच्या झळा

Maharashtra Agriculture : परभणी जिल्ह्यात शुक्रवारपासून केवळ ‘एफएफएस’ ॲपद्वारे खत विक्री

SCROLL FOR NEXT