Onion Smuggling  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : टोमॅटोआड होणाऱ्या कांदा तस्करीचा भंडाफोड

Onion Export : आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याचे दर तेजीत आहेत. मात्र देशात कांद्यावर निर्यातबंदी लादण्यात आली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याचे दर तेजीत आहेत. मात्र देशात कांद्यावर निर्यातबंदी लादण्यात आली आहे. परिणामी, कांद्याची तस्करी वाढली आहे. अशाच एका प्रकरणात सीमा शुल्क विभागाच्या पथकाने नुकत्याच केलेल्या कारवाईत तब्बल ८२ टन कांदा जप्त करण्यात आला आहे. टोमॅटो निर्यातीआड ही कांदा तस्करी सुरू होती, अशी माहिती संबंधित खात्याच्या सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीस बंदी घातल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर दबावात आहेत. कांदा उत्पादकांच्या खर्चाची भरपाई देखील होत नसल्याने त्यांच्यामध्ये केंद्र सरकारबद्दल रोष आहे. केंद्र सरकार केवळ ग्राहकहित पाहत असल्याचा कांदा उत्पादकांचा आरोप आहे.

दरम्यान, अशातच जादा दर मिळविण्याच्या अपेक्षेने देशातून कांदा तस्करी वाढली आहे. संत्रा, टोमॅटो तसेच इतर शेतीमालाच्या आडून ही तस्करी होत आहे. अशाच एका तस्करी प्रकरणाविषयी गोपनीय माहिती मिळालेल्या सीमा शुल्क विभागाने नागपुरात कारवाई केली.

नाशिकचे दोन निर्यातदार नागपुरातून संयुक्‍त अरब अमिराती (यूएई)मध्ये कांदा निर्यातीच्या प्रयत्नात होते. टोमॅटो निर्यातीच्या आडून ही तस्करी होणार होती. सीमा शुल्क विभागाच्या पथकाने चार कंटेनरची तपासणी केली.

या ४० फूट उंच कंटेनरमध्ये वरच्या पाच फुटांपर्यंत टोमॅटोचे बॉक्‍स होते. त्यानंतरच्या भागात बॉक्‍स तसेच पोत्यात ८२.९३ टन कांदा लपविण्यात आला होता. हा माल जप्त करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Issues: शेतीप्रश्न गांभीर्याने घ्या: शरद पवार

Pune Heavy Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचे थैमान

Ahilyanagar Heavy Rainfall: अहिल्यानगरला दुसऱ्या दिवशी अठरा मंडलांत अतिवृष्टी

Irrigation Project: सिंचन प्रकल्पांसाठी ‘नाबार्ड’कडे १५ हजार कोटींचा कर्जप्रस्ताव

Solapur Rain Damage: सोलापुरात १ लाख हेक्टरवरील पिके बाधित

SCROLL FOR NEXT