Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : नगरमध्ये दुसऱ्यांदा पडले कांद्याचे दर

राज्यात सर्वच बाजार समित्यांत कांद्याला चांगले दर मिळत असताना नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. ५) दुसऱ्यांदा कांद्याचे दर पडले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले.

टीम ॲग्रोवन

नगर ः राज्यात सर्वच बाजार समित्यांत कांद्याला चांगले दर (Onion Rate) मिळत असताना नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nagar APMC) शनिवारी (ता. ५) दुसऱ्यांदा कांद्याचे दर (Onion Market Rate) पडले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव (Onion Trade) बंद पाडले.

नगर बाजार समिती हप्तेखोरीमुळे शेवटच्या घटका मोजत आहे. तेथे गुंडागर्दी करणारे लोक आता नेप्ती बाजार समितीत घुसले आहेत. कांदा व्यापाऱ्यांवर त्यांचा दबाव आहे. परराज्यांतील व्यापाऱ्यांना ते लिलावासाठी येऊ देत नाहीत. दुसरीकडे बहुतांश अडतेच व्यापारी बनले आहेत. आंदोलनानंतर बाजारभाव वाढतात कसे, असा आरोप शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी केला. वेळ आल्यावर त्यांची नावे जाहीर करण्याचा इशाराही कार्ले यांनी दिला.

सोमवारी (ता. १) कांद्याचे दर सगळीकडे वाढले असताना नगर बाजार समितीत मात्र कांद्याचे दर पडले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करत लिलाव बंद पाडले होते. त्यानंतर दरवाढ केल्यावर लिलाव सुरू झाले. तोच प्रकार शनिवारी (ता.५) नगरला व्‍यापाऱ्यांनी घडवून आणला. सगळीकडे कांदा दर ४ हजारांपर्यंत असताना नगर येथे २७०० रुपयांपर्यंत लिलाव झाले.

त्यातही बहुतांश कांदा २ हजारांच्या आतच खरेदी होऊ लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीतील लिलाव बंद केले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर लिलाव पूर्ववत झाले. त्यानंतर कांद्याला चांगला भाव मिळाला.

सायंकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजार समितीत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत टीकास्त्र सोडले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, माजी सभापती रामदास भोर, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, प्रकाश कुलट, जिवा लगड, सुशील कदम आदी उपस्थित होते.

सध्या बाजार समितीवर प्रशासक आहे. त्यांचा कारभारावर कोणताच अंकुश नाही. त्यांच्याकडे कोणत्या भावाने किती वक्कल गेले, याची माहितीच नाही. राहुरीसह इतर बाजार समितीत कारभार पारदर्शक आहे. इथे वेगळी स्थिती आहे. एखाद दुसऱ्या वक्कलला चांगला भाव काढायचा आणि नंतर उर्वरित कांदा पडत्या भावाने घ्यायचा, असा फंडा आहे. आता खपवून घेणार नाही. लढा उभारू
संदेश कार्ले, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना, नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT